
Mumbai, 18 March : विधानसभेत आज (ता. 18 मार्च) ‘पॉईंट ऑफ इन्फार्मेशन’ आणि ‘पॉईंट ऑफ ऑर्डर’ या मुद्यावरून अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि काँग्रेसचे आमदार नाना पटोले, शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांच्यात जोरदार चकमक झाली. ‘पाईंट ऑफ प्रोसेजर’वरून नार्वेकरांनी भास्कर जाधवांना चांगलेच सुनावले. त्यानंतर नाना पटोले यांनी तुमच्यावर (मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांकडे बोट करत) त्यांचा दबाव आहे, असा आरोप केला. त्यावर नार्वेकर चांगलेच संतापले, माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. तुम्ही जे आरोप करत आहात, ते सभागृहाचा अवमान करणारे आहेत, याची नोंद घ्यावी, असे सुनावले.
पॉईंट ऑफ इन्फार्मेशनवरून विधानसभेत अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर (Rahul Narweka) आणि भास्करराव जाधव यांच्यात सुरुवातीला नोकझोक झाली. पाईंट ऑफ प्रोसेजरवर आपण बोलायला तयार आहात का अध्यक्ष महोदय? असा पश्न भास्कर जाधव यांनी केला. त्याला नार्वेकरांनी तुम्हाला ‘पाईंट ऑफ प्रोसेजर’वर चर्चा घ्यायची आहे का? असा प्रतिप्रश्न केला. त्यावर भास्कर जाधवांनी ‘ते आपण सुरू केलं,’ असे ठणकावले.
‘तुम्हाला फक्त आठवण करून दिली की नाना पटोले (Nana Patole) यांनी तीन पॉईंट ऑफ ऑर्डर घेत तीन प्रस्ताव प्रलंबित आहेत, असे सांगितले. आता तुम्ही बसून घ्या, असे नार्वेकरांनी सुनावले. त्यावर जाधवांनी ‘तुम्हा फक्त नाना पटोले यांनी बोलले हे लक्षात आणून देत आहात. पण ते प्रस्ताव पहिल्या दिवसांपासून सुरू आहेत. अर्धा तासाची चर्चा पहिल्या दिवसांपासूनची आहे,’ असे स्पष्ट केले. त्यावर अध्यक्षांनी ‘त्या प्रस्तावावर चर्चा घडवून आणण्याची जबाबदारी माझी आहे आणि ती योग्यरित्या पार पाडीन, तुम्ही बसा,’ असे म्हटले.
तिसरा आठवडा आला तरी ती चर्चा होत आहे, असे जाधव यांनी सांगितले. त्यावर ‘चर्चा होणारच’, असे अध्यक्ष नार्वेकर यांनी ठकणावून सांगितले. त्यावर भास्कर जाधवांनी (Bhaskar Jadhav) ‘ह्याला काय अर्थ आहे का?,’ असे हताश उदगार काढले.
भास्कर जाधव यांच्यानंतर नाना पटोले यांनी विधीमंडळ आवारात पत्रकाराला धमकाविल्याच्या घटनेवर भाष्य केले. विधीमंडळ आवारात मीडियाचे लोकही सुरक्षित नसतील तर ही गंभीर बाब आहे. त्यामुळे ‘पॉईंट ऑफ इन्फार्मेशन’च्या माध्यमातून प्रश्न विचारतो. अध्यक्ष महाराज, काय माहिती?, पण तुम्ही इकडच्या बाकावर (विरोधी) एकदम रागवता. आम्ही तुम्हाला मदत करण्यासाठीच आहे, अध्यक्ष महाराज. तुमचा काही तरी गैरसमज आहे. तुम्हाला त्यांचा (मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांकडे बोट करत) दबाव आहे. पण, तुम्ही तो दबाव बाळगू नये, आम्ही तुमच्यासोबत आहोत, असा मुद्दा मांडला.
त्यावर अध्यक्ष नार्वेकर यांनी ‘हे चुकीचे आहे. ते रेकॉर्डवरून त्वरित काढून टाकलं पाहिजे. माझ्यावर कोणाचाही दबाव नाही. आपण स्वतः माजी अध्यक्ष राहिलेला आहात, या सभागृहाचे नेतृत्व केलेले आहे. आपल्याकडून अशी भाषा आणि असा शब्दप्रयााेग अपेक्षित नाही. नानाभाऊ, अध्यक्ष हे कोणाच्याही दबावाखाली काम करत नसतात. अध्यक्षांवर असा आरोप करणं, म्हणजे आपण सभागृहाचा अवमान करत आहात, याची आपण नोंद घ्याव, असा इशाराही नार्वेकर यांनी पटोले यांना दिला.
सत्ताधारी बाकावरून नाना पटोले यांनी ‘तो शब्द मागे घ्यावा,’ अशी मागणी होऊ लागली आहे. त्यावर शब्द मागे घेतला. पण, तो चिमटा घेणे आवश्यक आहे. आमच्या हक्काचे संरक्षण करण्याची जाबाबदारी आपली आहे, असेही पटोले यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.