Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Ajit Pawar : नवाब मलिकांच्या भूमिकेकडे अजित पवारांचे लक्ष; फडणवीसांच्या पत्रावर बोलणेच टाळले

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Winter Assembly Session 2023 : जामीन मिळाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिकांनी नागपूर विधीमंडळात गुरुवारी प्रथमच हजेरी लावली. ते सत्ताधारी बाकावर बसले. यावरून विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आंबादास दानवेंनी भाजपच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी थेट उपमुख्यमंत्री अजित पवारांना पत्र पाठवून महायुतीत अडचण होण्याची शक्यता वर्तवली. यावरून राज्याचे राजकारण पुरते ढवळून निघाले असताना अजितदादांनी मात्र मलिकांच्या भूमिकेनंतरच बोलेन, असे स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी नवाब मलित तुरुंगात होते. त्यांना तब्येतीच्या कारणास्तवर जामीन मंजूर झाला आहे. त्यांनी मात्र ते राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये थांबणार की अजित पवार गटासोबत जाणार, याबाबत स्पष्टीकरण दिलेले नाही. दरम्यान, विधिमंडळाच्या नागपूर अधिवेशनात त्यांनी गुरुवारी हजेरी लावत थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसणे पसंत केले. यावरून मलिकांनी आपण अजित पवार गटासोबत असल्याची भूमिका स्पष्ट केल्याचे संकेत मिळाल्याच्या चर्चेला सुरूवात झाली.

मलिकांच्या या कृतीवर आंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी सत्ताधारी भाजपला धारेवर धरत कडक शब्दात सुनावले. यावर त्याच पद्धतीने फडणवीसांनीही उत्तर दिले. त्यानंतर मात्र फडणवीसांनी उपमुख्यमंत्री पवारांना पत्र पाठवून मलिकांमुळे महायुतीत होणाऱ्या अडचणीची जाणीव करून दिली. यावर अजित पवारांनी जास्त बोलणे टाळले आहे. परिणामी मलिक नेमके कोणत्या गटात आहेत, याबाबत कुणीही अद्याप स्पष्ट भूमिका घेतल्याचे दिसून आलेले नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काय म्हणाले अजित पवार ?

नवाब मलिकांवरून फडणवीसांच्या पत्रावर विचारले असता, पवार म्हणाले, 'मला पत्र मिळाले, ते पत्र मी वाचलेले आहे. राज्यात झालेल्या राजकीय घडामोडींनंतर ते प्रथम आले आहेत. त्यांनी समर्थनाची आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. पहिल्यांदाच विधानभवनात आलेले मलिक कुठे बसले हे सर्वांना माहिती आहे. आता स्वतः मलिकांनी भूमिका स्पष्ट केल्यानंतर, ती एकल्यानंतर माझे मत व्यक्त करीन. प्रत्येकाला आपली भूमिका मांडण्याचा अधिकार आहे. सद्या ते प्रकृती अस्वास्थामुळे त्यांना कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. आता त्या पत्राला उत्तर द्यायचे की नाही, ते माझे मी ठरवेन,' असेही अजित पवारांनी ठणकावून सांगितले.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT