Political News : निवडणुकीत हरले अन् घरात पाय घसरून पडले; केसीआर रुग्णालयात

K. Chandrashekhar Rao : केसीआर हे एरावल्ली येथील फार्महाऊसमध्ये रात्री पाय घसरून पडले.
K. Chandrashekhar Rao
K. Chandrashekhar RaoSarkarnama
Published on
Updated on

Telangana News : तेलंगणा विधानसभा निवडणुकीत दारूण पराभव पत्करावा लागल्याने माजी मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना मोठा धक्का बसला आहे. त्यातच शुक्रवारी मध्यरात्री ते घरातच पाय घसरून पडल्याने जखमी झाले आहेत. त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे. दरम्यान, त्यांच्या खुब्याला दुखापत झाल्याची माहिती त्यांची मुलगी आमदार के. कविता यांनी ट्विटरवरून दिली.

निवडणुकीत (Election) पराभव झाल्यानंतर केसीआर लगेच एरावल्ली फार्महाऊसवर आले होते. त्यांनी राज्यपालांकडून राजीनामा सोपवून सरकारी निवासस्थान सोडले. मागील नऊ वर्षे ते याठिकाणी राहत होते. मात्र, काही महिन्यांपासून ते फार्महाऊसवरच नेत्यांच्या बैठका घेत होते. निवडणुकीतील पराभवानंतरही ते नवनियुक्त आमदारांना पहिल्यांदा याच फार्महाऊसवर भेटले होते.

K. Chandrashekhar Rao
Congress : शपथविधी सुरू असतानाच मुख्यमंत्र्यांच्या घराबाहेर बुलडोझर; काय आहे प्रकरण?  

केसीआर हे याच फार्महाऊसमध्ये रात्री पाय घसरून पडले. त्यांना तातडीने सिंकदाराबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. केसीआर यांच्या खुब्याच्या हाडाला फ्रॅक्चर झाले आहे. डॉक्टरांकडून आवश्यक काळजी घेतली जात असून गरज भासल्यास शस्त्रक्रिया केली जाईल, असे बीआरएसच्या नेत्यांकडून सांगितले जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दरम्यान, केसीआर यांच्या पक्षाला ११९ पैकी केवळ ३९ जागा मिळाल्या आहेत. तर काँग्रेसने ६४ जागा मिळवत सत्ता स्थापन केली आहे. केसीआर यांना सलग तिसऱ्यांदा विजय अपेक्षित होता. पण त्यांनाच एका जागेवर पराभव पत्करावा लागला आहे. त्यांनी दोन ठिकाणाहून विधानसभेची निवडणूक लढविली होती.

(Edited By - Rajanand More)

K. Chandrashekhar Rao
CM Revanth Reddy : मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताच रेवंथ रेड्डींनी घेतले दोन धडाकेबाज निर्णय

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com