Praful Patel, Sharad Pawar Sarkarnama
विदर्भ

Praful Patel : इक्बाल मिर्चीच्या संबंधांबाबत शरद पवारांनीच उत्तर दिलंय; 'त्या' आरोपांना पटेलांची बगल

Nawab Malik : नवाब मलिकांबाबत निवडणूक आयोगाला कुठलेही प्रतिज्ञापत्र सादर केलेले नाही

Sunil Balasaheb Dhumal

Nagpur Winter Session 2023 : देशद्रोहाचा आरोप असलेले राष्ट्रवादी नेते, माजी मंत्री नवाब मलिकांवरून विरोधकांनी भाजपची कोंडी केली आहे. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी, अजित पवारांना पत्र लिहित सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा असल्याचे सांगून मलिकांना महायुतीत सहभागी करून घेता येणार नसल्याची भूमिका मांडली. यावर भाजपला मलिक नको असतील, तर अंडरवर्ल्डशी संबंधाचा आरोप असलेले अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल कसे चालतात, असा कळीचा प्रश्न उपस्थित केला आहे. हे आरोप फेटाळत पटेलांनी या प्रकरणाचा चेंडू थेट शरद पवारांच्या कोर्टात टोलावला आहे.

ऐन हिवाळी अधिवेशनात नवाब मलिकांच्या राजकीय भूमिकेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अधिवेशनात उपस्थित राहिलेले मलिक थेट सत्ताधारी बाकावर जाऊन बसल्याने विरोधकांनी भाजपला धारेवर धरले. याबाबत फडणवीसांचे अजित पवारांना लिहिलेले पत्रच व्हायरल झाल्याने महायुतीत तेढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मलिक आले की भाजपला देशाची आठवण होते, मग इक्बाल मिर्ची यांच्याशी संबंधित आरोप असलेले पटेल कसे चालतात, असा प्रश्न विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी उपस्थित केला.

विरोधकांच्या आरोपावर (Sharad Pawar) शरद पवारांचे नाव घेऊन पटेलांनी बगल दिली. पटेल म्हणाले, माझ्याबद्दल जाण नाही त्यांना उत्तर देण्याची काही गरज नाही. माझ्याबद्दल पूर्वी शरद पवारांनी उत्तर दिलेले आहे. तेच आताही उत्तर आहे. माझे कुणाशीही काहीही संबंध नव्हते. नाना पटोले हे हताश झालेले आहेत. त्यांना उद्याची चिंता आहे. त्यांच्यावर मोठे संकट येणार आहे. राज्यात, देशाची दिशा ठरलेली आहे. मोदींच्या नेतृत्वात सरकार येणार आहे. राज्यातही शिंदे, फडणवीस आणि पवार सरकार स्थापन करतील. यामुळे विरोधकांत निराशा पसरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

नवाब मलिकांबाबत भूमिका नाही

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार (Ajit Pawar) गटासोबत असलेल्या सर्वांचे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगात सादर केले आहे. मात्र, नवाब मलिकांबाबत कुठलेही प्रतिज्ञापत्र सादर केले नसल्याचे पटेलांनी सांगितले. मलिकांच्या राजकीय भूमिकेबाबत त्यांच्यावर कुठलाही दबाव आणला नसल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले. मलिक कुठे बसले याचा निराश झालेल्या विरोधकांनी मुद्दा बनवला, तर फडणवीसांच्या पत्राचा वेगळा अर्थ काढण्याची काही गरज नाही, असेही पटेलांनी या वेळी स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT