Nagpur Assembly Session : शरद पवार, अजितदादांचे आमदार एकत्र येणार, पण...; अधिवेशनात नेमकं काय घडलं?

NCP News : परस्पर विरोधी गट एकत्र येण्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

NCP News : अजित पवारांच्या बंडखोरीनंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले आहेत. एकीकडे अजित पवार यांचा गट सत्तेत सामील आहे. दुसरीकडे शरद पवार यांचा गट विरोधात आहे. सत्ताधारी आणि विरोधक असलेल्या पक्षातील दोन्ही गटाला नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात एकच कार्यालय देण्यात आले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटाचे काम आता एकाच कार्यालयातून चालणार आहे. यामुळे दोन्ही गटातील सत्ताधारी आणि विरोधक एकाच कार्यालयात असणार आहेत. त्यातून सत्ताधारी आणि विरोधक एकाच कार्यालयात आमने-सामने येणार असल्याने नवा वाद निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Sharad Pawar, Ajit Pawar
Uddhav Thackeray : शिर्डी जिंकण्यासाठी ठाकरेंनी 'फिल्डिंग' लावली; 'या' निष्ठावंतांवर मोठी जबाबदारी सोपवली

राज्यात शिवसेनेप्रमाणेच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये दोन गट पडले. अजित पवार यांनी बंडखोरी केल्यानंतर ते महायुती सरकारमध्ये सामील झाले. शरद पवार (Sharad Pawar) यांचा गट महाविकास आघाडीसोबत विरोधी पक्षात आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. दोन्ही गटाचे अध्यक्ष आणि इतर पदाधिकारी वेगवेगळे आहेत. दोन्ही गटाकडून आम्हीच राष्ट्रवादी असल्याचा दावा केला जात आहे. त्याचा परिणाम राज्य विधिमंडळाच्या नागपूर येथील हिवाळी अधिवेशनातही दिसून येईल, असे सांगण्यात येत होते.

नागपुरात यावर्षीच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून सुरुवात होणार आहे. नागपूरातील विधान भवन परिसरात जवळपास सर्वच पक्षांना कार्यालय मिळाले आहेत. शिवसेनेत दोन गट पडल्यानंतर या पक्षाला दोन कार्यालय देण्यात आले आहेत. मात्र, राष्ट्रवादीत दोन गट पडल्यानंतरही दोन्ही गटाला एकच कार्यालय देण्यात आले आहे. एकाच कार्यालयात दोन्ही गटांना विभागणी करून कार्यालय मिळणार आहे. त्यामुळे हा मुद्दा हिवाळी अधिवेशनात चांगलाच रंगण्याची शक्यता आहे. विधान भवनातील कार्यालय आपल्यालाच मिळणार असल्याचा दावा राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांकडून करण्यात येत होता. आता एकच कार्यालयात दोन गटांना विभागून देण्यात आल्याने. दोन्ही गटाचा दावा खरा ठरल्याची मिश्किल प्रतिक्रिया विधिमंडळ वर्तुळात व्यक्त होत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

गुरुवारी सायंकाळपर्यंत विधान भवनातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पक्ष (NCP) कार्यालयाला अंतिम स्वरूप देण्याचं काम सुरू होतं. अधिवेशनाला सुरुवात होतात राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाचे पदाधिकारी व नेते एकाच कार्यालयामध्ये कामकाजाला सुरुवात करणार आहेत. त्यामुळे कोण कुठे बसणार याबद्दल अद्यापही उत्सुकता कायम आहे. दोन्ही गटाला एकच कार्यालय देत विधान भवन सचिवालयाने नेत्यांना अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस पूर्वसंध्येला 'सरप्राईज' दिले आहे. अधिवेशन सुरू झाल्यानंतर नेमकी बैठक व्यवस्था पाहून राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन्ही गटाच्या नेत्यांना आणखी एक 'सरप्राईज' मिळणार आहे.

विधिमंडळ सचिवालयाच्या या निर्णयामुळे सभागृहाच्या पटलावर राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात बोलणार असले तरी पक्ष कार्यालयात मात्र, त्यांना मिळून मिसळून काम करावे लागणार आहे.

(Edited by Sachin Waghmare)

Sharad Pawar, Ajit Pawar
NCP News : ...म्हणून मावळात राष्ट्रवादीला पाच महिन्यांपासून अध्यक्षच नाही!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com