Madha Lok Sabha Constituency : माढा लोकसभा मतदारसंघावरून भाजपमधील खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि विजयसिंह मोहिते पाटील आमने-सामने येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मात्र खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर हेच माढ्याचे उमेदवार असतील, असे संकेत दिले होते. आता मात्र सावध भूमिका घेत बावनकुळेंनी मोहिते पाटील आणि आम्ही पाहून घेऊ, अशी प्रतिक्रया दिली. परिणामी माढ्यातील राजकीय वातावरण वेगळ्या वळणावर आल्याची चर्चा आहे.
माढा लोकसभा मतदारसंघात खासदारांनी मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीतही ते मागील वेळीपेक्षाही अधिक मते घेऊन विजयी होतील, असा विश्वास बावनकुळेंनी व्यक्त केला. त्यामुळे मोहिते पाटील व खासदार निंबाळकर यांच्यात संघर्ष पेटण्याची चिन्हे आहेत. माढ्यातून धैर्यशील मोहिते पाटलांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. यानंतर बावनकुळेंनी केलेल्या विधानाने माढ्यातील राजकीय वातावरण आतापासूनच तापण्याची शक्यता आहे.
खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारीचे संकते आणि धैर्यशील मोहिते पाटलांचा दावा, यावर आता बावनकुळे बॅकफूटवर गेल्याचे दिसून आले. यावर त्यांनी सावध पवित्रा घेत काहीही बोलण्यास नकार दिला. मोहिते पाटील आणि आम्ही पाहून घेऊ, एवढेच बोलून बावनकुळेंनी माढा लोकसभेच्या जागेवर एकही शब्द काढला नाही. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये राजकीय तेढ निर्माण होणार असल्याचे बोलले जात आहे. यावर भाजप श्रेष्ठी कसा तोडगा काढतात, याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
दरम्यान, माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यावर मोहिते पाटील आक्रमक आहेत. लोकसभेच्या निवडणुकीसाठी त्यांनी तयारी सुरू केली आहे. मतदारसंघात धैर्यशील मोहिते पाटलांचे ‘भावी खासदार’ असे बॅनर झळकत आहेत.
बावनकुळेंच्या संकेतानंतर उमेदवारीबाबत धैर्यशील मोहिते पाटलांना विचारले असता, ‘ माढ्यातून लोकसभेसाठी भाजप आपणास या वेळी शंभर टक्के उमेदवारी देईल,’ असा विश्वास व्यक्त केला आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.