Bacchu Kadu and Prakash Ambedkar Sarkarnama
विदर्भ

Nagpur Winter Session : ''...तर प्रकाश आंबेडकरांना मुख्यमंत्री केलं पाहिजे'' ; बच्चू कडूंचं विधानसभेत विधान!

Bacchu Kadu and Prakash Ambedkar News : ''... तर महाराष्ट्र बेचिराख होईल.'' अशी भीतीही बच्चू कडू यांनी विधिमंडळातच व्यक्त केली आहे.

जयेश विनायकराव गावंडे

Assembly Winter Session : आपल्या हटके भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वच पक्षातील नेत्यांवर चौफेर टीका केली.

जातीपातीच्या नावावर राज्यातील कायदा व सुव्यवस्था बिघडवू नका, असं आवाहनही त्यांनी केलं. तसेच, ''राज्यात शांतता नांदावायची असेल, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे नातू अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर(Prakash Ambedkar) यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे तेव्हा सगळ्यांना न्याय मिळेल.'', असंही कडू म्हणाले.

हिवाळी अधिवेशनात दुसऱ्या आठवड्यातील तिसऱ्या दिवशी मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून चर्चा झाली. चर्चेत अनेकांनी आपली मतं व्यक्त केली. या मुद्द्यावरून आमदार बच्चू कडू(Bacchu Kadu) यांनी चांगलाच हल्लाबोल केला.

आमदार बच्चू कडू म्हणाले की, ''जातीपेक्षा, हक्कापेक्षा हक्काची लढाई महत्वाची असते. शेतकऱ्यांना त्यांचा भाव मिळत नाही. मजुरांना मजुरी मिळत नाही. शेतकऱ्यांना भाव मिळाला तर सगळे प्रश्न मिटतील. परंतू शेतकऱ्यांसाठी 75 वर्षांत कोणताच पक्ष काहीच करू शकत नाही, हे सिद्ध झालं आहे.''

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

याचबरोबर ''शेतकऱ्यांच्या पाठिशी कुणीच उभं राहत नाही. आपल्यावर 350 गुन्हे दाखल आहेत. चार ते पाच गुन्ह्यात कोर्टानं पाच-पाच वर्षांची शिक्षा सुनावली आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून असं होणं आपल्यासाठी नवीन नाही. श्रीमंतानी अधिक श्रीमंत व्हावं आणि गरीबांनी अधिक गरीब व्हावं. मग गरिबानं श्रीमंताच्या घरी भांडी घासावी ही देशातील व्यवस्था आहे. या व्यवस्थेला तोडण्याची ताकद कुणात नाही.'' असंही कडू यांनी बोलून दाखवलं.

''आरक्षणावरून नेते मोठे होणार आणि कार्यकर्ते संपून जाणार आहेत. मोठ मोठे नेते द्वेष पसरविणारी भाषणं करीत असतील तर कसं होईल. काही सभा आपण ऐकल्या. त्यात एकजण म्हणतो 160 आमदांरांना आम्ही पाडू. ही भाषा अयोग्य आहे? समजदार लोकं जातीवर बोलले तर महाराष्ट्र बेचिराख होईल.'' अशी भीतीसुद्धा बच्चू कडू यांनी व्यक्त केली.

तसेच ''जातीनिहाय जनगणना होणं गरजंचं आहे, अशीही मागणी होत आहे. काही आमदार केवळ जातीच्या नावावर निवडून येतात. काम करो अथवा न करो ते कायम असतात. त्यामुळं प्रकाश आंबेडकर यांना मुख्यमंत्री केलं पाहिजे.'' असं ते म्हणाले.

याशिवाय मराठा आरक्षण(Maratha Reservation), शेतकरी-शेतमजूर, दिव्यांग, ओबीसी आणि सर्वच समाजातील घटकांबद्दल शासनानेच नव्हे तर लोकप्रतिनिधी या नात्यानं सर्वांनीच जबाबदारीनं वागलं पाहिजे, अशी अपेक्षाही प्रहार जनशक्ती पार्टीचे नेते आमदार बच्चू कडू यांनी बुधवारी विधानसभेत चर्चेदरम्यान व्यक्त केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT