Chhagan Bhujbal : " माझी हत्या होऊ शकते...!"; भुजबळांचा सभागृहात खळबळजनक दावा

  Nagpur Winter Session : ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यास भुजबळांचा विरोध
Chhagan Bhujbal
Chhagan BhujbalSarkarnama

Nagpur News : राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून ओबीसी आणि मराठा समाजामध्ये वादाच्या ठिणग्या पडत आहेत. त्यातच छगन भुजबळ यांनी मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देण्यास विरोध केला. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी सभाही घेतल्या त्यामुळे मराठा समाजाच्या आंदोलकांकडून छगन भुजबळांवर निशाणा साधला जात आहे. त्यावरून छगन भुजबळ यांनी मला गोळी मारण्याचा प्रयत्न असल्याचा अहवाल पोलिसांनी दिला असल्याची खळबळजन माहिती सभागृहात दिली. तसेच मला गोळी मारली तरी चालेल मी मरायला तयार आहे. माझा मराठा आरक्षणाला विरोध नाही. मात्र त्यांना स्वतंत्र आरक्षण द्यावे. तसेच माझा विरोध झुंडशाही असल्याचे म्हणत त्यांनी नाव न घेता मराठा समाजाच्या आंदोलकांवर टीकास्त्र सोडले.

विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर चर्चासत्र दरम्यान बोलताना भुजबळ म्हणाले, मराठा समाजाचे आंदोलक जरांगे पाटील यांच्याकडून वारंवार माझ्यावर टीका केली जात आहे. मात्र माझा मराठा समाजाला आरक्षण देण्यास विरोध नाही. परंतु सरसकट मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देता येणार नाही. ज्यांच्या निजामकालीन कागदपत्रात कुणबी नोंदी आहेत. त्यांना नोंदी द्यायला आमचा विरोध नाही. जर सरसकट मराठा समाजाला आरक्षण द्यायचे असेल तर त्यांना स्वतंत्र आरक्षण देण्याची मागणी भुजबळ यांनी केली. तसेच मराठा आंदोलकांनी बीडमध्ये जाळपोळ केल्यानंतर मी मराठा आंदोनाला विरोध करायला सुरुवात केली असल्याचेही भुजबळ यांनी सभागृहात स्पष्ट केले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Chhagan Bhujbal
Health Minister Tanaji Sawant : आरोग्य मंत्री तानाजी सावंत गोंधळले

यावेळी भुजबळ यांनी ज्या प्रमाणे मराठा आरक्षणासाठी अंतरवालीमध्ये सभा झाल्यानंतर शेतकऱ्यांचे नुकसान झाले. त्यांना नुकसान भरपाई दिली पाहिजे. त्याच प्रमाणे बीडमध्येही विधानसभेच्या सदस्यांची घरे जाळली, काही व्यावसायिकांची हॉटेल जाळले, मग हे नुकसान नाही का? असा सवाल करत त्यांनाही मदत करण्याची मागणी भुजबळ यांनी केली.

मराठा समाज आणि कुणबी वेगळे

मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यास भुजबळांनी विरोध केला. ते म्हणाले, ज्यांच्या मुळ नोंदी कुणबी आहेत त्यांना आरक्षण देण्यास आमचा विरोध नव्हता. तस निजामकालीन नोंदीमध्ये राहिलेल्यांचे दाखले देण्यास आमचा विरोध नव्हता. मात्र आता सरसकट मराठा समाजाला कुणबी म्हणून आरक्षण देण्यास आमचा विरोध आहे. तसेच कुणबी आणि मराठा वेगळे आहेत. नारायण राणे यांनी देखील मराठा म्हणून आम्ही कुणबी प्रमाणपत्र घेणार नसल्याचेही स्पष्ट केले आहे. मग आता हजारोंच्या संख्येने कुणबी नोंदी कुठून आल्या असा सवाल भुजबळ यांनी केला.

Chhagan Bhujbal
Bhujbal vs Prithviraj Chavan : पृथ्वीराज चव्हाण भडकले, मुख्यमंत्र्यांसमोरच भुजबळांना झापले | Nagpur

दरम्यान, आंदोलकांना ओबीसीमधून आरक्षण मागू नये, गावबंदी करणे, सरकसकट कुणबी मागणी करणे, शासनाला वेठीस धरणे चूक आहे, काडतूस बाळगणे चूक आहे, जाळपोळ करणे चूक आहे हे  का सांगितले नाही असा सवाल करत भुजबळ यांनी यावेळी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर ही निशाणा साधला.

Chhagan Bhujbal
Praniti Shinde vs Tanaji Sawant : प्रणिती शिंदे, तानाजी सावंत यांच्यात जुंपली...

गाव बंदी बोर्ड लावणाऱ्यावर गुन्हे दाखल करा

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करणे ठीक आहे. मात्र लोकप्रतिनिधींना गावबंदी करणे कशासाठी आमदारा्ंना गाव बंदी तर मग ठराविक नेत्यांना परवानगी कशी काय दिली? असा सवालही भुजबळ यांनी उपस्थित केला. तसेच हा प्रकार कुठेतरी थांबाला पाहिजे आणि ज्यांनी असे गावबंदीचे बोर्ड लावले त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली.

Chhagan Bhujbal
Parliament Winter Session 2023: "त्या घटनेनंतर देखील संसद चालली ;आता ही चालणार"...

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com