Maratha Reservation : ''24 डिसेंबरला निर्णय झाला नाहीतर…'' ; शशिकांत शिंदेंचा सरकारला सूचक इशारा!

MLA Shashikant Shinde : ''...त्यामुळे मराठा समाजात फूट पडायला लागली आहे.'' असंही शशिकांत शिंदेंनी म्हटलं आहे.
NCP MLA Shashikant Shinde
NCP MLA Shashikant Shindesarkarnama
Published on
Updated on

Nagpur Winter Session : राष्ट्रवादीचे(शरद पवार गट) आमदार शशिकांत शिंदे यांनी मराठा आरक्षणाच्या मुद्द्य्यावरून बुधवारी सभागृहात आक्रमक भूमिका घेतली. ''आरक्षणाच्या मुद्द्यावरुन समाजनिहाय नेत्यांची विभागणी सुरु आहे. शिंदे, फडणवीस सरकारमधील प्रतिनिधीच सोयीचे राजकारण करायला लागला आहे. त्यामुळे मराठा समाजात फूट पडायला लागली आहे. जाणीवपूर्वक वाद निर्माण करण्याचा प्रयत्न सुरु असून येत्या 24 तारखेचा निर्णय लांबणीवर नेण्याचा प्रयत्न सरकार करत आहे.'' अशी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

याचबरोबर ''त्यादिवशी निर्णय झाला नाहीतर मराठा समाजात समाजात तेढ निर्माण होणार असून त्याची जबाबदारी राज्य सरकारची आहे.'' असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.

नागपूर अधिवेशनात सध्या मराठा आरक्षणावरुन वातावरण तापले आहे. याबाबतच्या मराठा आरक्षण विधेयकावर विधान परिषदेच्या सभागृहात चर्चा करताना आमदार शिंदेंनी सरकारवर हल्लाबोल्ल करत सभागृहात पाठिंबा देणारे सभागृहाबाहेर गेल्यावर का विसरतात?, असा सवाल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

NCP MLA Shashikant Shinde
Chhagan Bhujbal : " माझी हत्या होऊ शकते...!"; भुजबळांचा सभागृहात खळबळजनक दावा

सभागृहात बुधवारी मराठा व इतर समाजाच्या आरक्षणासंदर्भात चर्चा होत असून यामुळे अवघ्या समाजाचे अधिवेशनाकडे लक्ष लागून आहे. चर्चा संपेपर्यंत आरक्षणाचा निर्णय लागेल, असा विश्वास मराठा, ओबीसी, धनगर समाजाला आहे. असे सांगून आमदार शशिकांत शिंदे(Shashikant Shinde) म्हणाले, ''या आंदोलनाच्या संदर्भात सरकारने विविध भूमिका घेतल्या आहेत. सभागृहात एकत्रित चर्चा करताना विधानसभा असो की विधान परिषद सर्वांनी एकमताने पाठींबा देण्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे. पण, आज या अधिवेशनात चर्चा घडविताना एकमेकांवर आरोप करणे, बोट दाखविण्याचा प्रयत्न होतोय, याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा. ''

याशिवाय ''मराठा आंदोलनाची तीव्रता वाढल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय बैठक बोलावली. सर्वच पक्षाचे नेते मंडळी बैठकीला उपस्थित राहिले. त्यांनी घेतलेल्या निर्णयाला एकमताने पाठिंबा देण्याचा निर्णय झाला. त्याला काहीच दिवस झाले असतील आता एकमेकांवर आरोप प्रत्योरोप सुरु झाले आहेत. हा निवडणुकीच्या राजकारणाचा प्लॅन आहे, का?'' असा प्रश्न आमदार शिंदे यांनी केला.

तसेच, ''सभागृहात सर्वपक्षाचे नेते या विषयावर एकत्र आहेत.तसेच बाहेरही सर्वजण समाजाच्या पाठीशी उभे आहोत हा संदेश गेला पाहिजे. पण, असे होत नाही. मराठा समाजाचे आंदोलन सुरु झाले त्यावेळी आंदोलनात एकही नेता नव्हता. पण तरीही शांततेत आंदोलने झाली, हा इतिहास आहे. समाजाचा सरकारवरील विश्वास उडाला आहे, असे चित्र निर्माण झाले आहे.'' असंही आमदार शिंदेंनी सांगितलं.

NCP MLA Shashikant Shinde
Nagpur Winter Session : मंत्री अतुल सावे येताच मातंग समाज मोर्चा आक्रमक

याशिवाय, ''जालन्यातील जरांगे पाटलांचे(Manoj Jarange Patil) नेतृत्व निर्माण झाले असून त्यांनी मराठा समाजातील खदखदीला वाचा फोडली आहे. समाजाचे नेते बाजूला झाले आणि मनोज जरांगे पाटलांच्या पाठीशी लाखोंच्या संख्येने मराठा समाजा उभा राहिला आहे. त्यामुळे त्यांना डिवचण्याचा प्रयत्न होत आहे.'' असं म्हटलं.

तसेच, ''आरक्षण प्रश्नावर सत्तेत असणाऱ्यांनी व नसणाऱ्यांनीही समतोल ठेवणे गरजेचे होते. मुख्यमंत्र्यांनी तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करुन जाहीर सभेत मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देणार असे सुतोवाच केले आहे. मग तरी त्यांच्याच मंत्रिमंडळात सगळ्यांची वेगवेगळी भूमिका का? असा प्रश्न करुन ही खदखद बाहेर निघते आहे का?'' असे प्रश्नही शशिकांत शिंदेंनी उपस्थित केले आहेत.

सध्या काही नेते मंडळी ओबीसींच्या व्यासपीठावर वेगळे वक्तव्य व मराठा समाजाच्या व्यासपीठावर वेगळी भाषा बोलत आहेत. त्यामुळे सरकारमध्ये एकमत नाही, मतभेद आहेत का, हा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबतचा खुलासा करणे ही सरकारची जबाबदारी होती. आता मराठा आंदोलनाची धग वाढली असून आरोप, प्रत्यारोपामुळे कार्यकर्ते व लोकांत अस्वस्थता निर्माण झाली आहे.

केवळ एकाच उपमुख्यमंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी संशयाचा पडदा दूर करावा. जनतेने नेत्यांची विभागणी केली असून सरकारमधील प्रतिनिधी आपल्या पध्दतीने सोयीचे राजकारण करायला लागला आहे. त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनात फुट पडायला लागली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com