Nagpur News: जिल्हा परिषदेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले. चक्रकार पद्धती मध्येच बंद केल्याने या विरोधात याचिकासुद्धा दाखल करण्यात आली होती. सर्वोच्च न्यायालयाने यास विरोध दर्शवण्यात आलेली याचिके फेटाळून लावली आहे. त्यामुळे येत्या दोन महिन्यांत जिल्हा परिषदेची निवडणूक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. याच नागपूर जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP Election) आरक्षण सोडतीचा मुहूर्त जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे निवडणुकीबाबत सुरू असलेल्या शंका कुशंका दूर होणार आहे.
आगामी नागपूर जिल्हा परिषद व नागपूर जिल्ह्यातील पंचायत समिती निवडणुकांसाठी आरक्षण निश्चित करण्याची सोडत ने सुरू झाली आहे. 6 ऑक्टोबरला बचतभवन सभागृहात आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालयाने अधिकृत सूचना प्रसिद्ध केली आहे.
जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) यांना पत्र पाठवून सोडतीबाबत माहिती दिली आहे. त्यानुसार, नागपूर जिल्हा परिषदेतील एकूण 57 गट आणि 13 पंचायत समित्यांतील 114 गणांसाठी आरक्षण निश्चित केले जाणार आहे. याशिवाय, पंचायत समित्यांच्या सभापती पदांची सोडतही त्याच दिवशी दुपारी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील बचत भवन सभागृहात काढण्यात येणार आहे.
महाराष्ट्र शासन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती नियम 1962 अनुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय तसेच महिलांसाठी आरक्षण ठरविण्यात येते. या आरक्षण (Reservation) प्रक्रियेत पारदर्शकता राखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व तयारी करण्यात आली आहे.
आगामी निवडणुकांपूर्वी होणारी ही आरक्षण सोडत स्थानिक राजकीय समीकरणांवर परिणाम करणारी ठरणार आहे. कारण, आरक्षणानुसार अनेक गट आणि पंचायत समित्यांमधील राजकीय चित्र बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे 6 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या सोडतीकडे सर्व राजकीय पक्ष, उमेदवार व कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा परिषदेच्या शून्यापासून आरक्षणावर शिक्कामोर्तब झाले आहे. जिल्हा परिषद गटाचे आरक्षण येत्या 6 ऑक्टोबरला काढण्यात येईल. वर्षभरानंतर निवडणूका होणार असल्याने उत्साह आहे. अनुसूचित जाती आणि जमातीचे आरक्षण हे चक्राकार पद्धतीने काढण्यात येते. आरक्षणानुसार प्रथम अनुसूचित जाती, त्यानंतर जमाती, नंतर ओबीसीचे आरक्षण काढले जाते. तसेच महिला आरक्षणही याचवेळी काढण्यात येणार आहे.
नागपूर जिल्हा परिषद मागासवर्गीयांसाठी 28 जागा राखीव आहेत. जिल्हा परिषदेत एकूण 57 गट आहेत. त्यापैकी 10 जागा अनुसूचित जातींसाठी, आठ जागा अनुसूचित जमातींसाठी तर 10 जागा ओबीसीसाठी राखीव राहणार आहेत. यातील 50 टक्के जागा ह्या महिलांसाठी राखीव राहणार आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.