Nana Patole Vs Bunty Shelke Sarkarnama
विदर्भ

Nana Patole Vs Bunty Shelke : नाना पटोले अन् बंटी शेळके वाद आता पोहचला दिल्ली दरबारी!

Nana Patole and Bunty Shelke controversy : अनेकांचे धाबे दणाणले; प्रदेश काँग्रेस कमेटीच्यावतीने शेळके यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली आहे.

Rajesh Charpe

Nagpur Congress News काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव तसेच मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे पराभूत उमेवदार बंटी शेळके यांच्यातील वाद आता दिल्लीत पोहचला आहे. कारणे दाखवा नोटीसला उत्तर देण्यासाठी शेळके यांनी काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथाला यांची भेट घेतली. ते राहूल गांधी यांचीसुद्धा भेट घेऊन आपल्या विरोधात कोणी आणि कसे काम केले याचे पुरावे सादर करणार आहेत. त्यामुळे अनेकांचे धाबे दाणाणले आहेत.

बंटी शेळके यांनी आपल्या पराभवासाठी पटोले हेच जबाबदार असून ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे(RSS) एजंट असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्यावर कोला होता. दुसऱ्या दिवशी प्रदेश काँग्रेस कमेटीच्यावतीने शेळके यांना कारणे दाखवा नोटीस बाजवण्यात आली आहे. या दरम्यान काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी बंटी शेळके यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. त्यांना 80 हजार मते मिळाली. काँग्रेसच्या कार्यकर्त्यंनी काम केले नसते तर एवढी मते त्यांना कशी काय मिळाली असा सवाल त्यांनी केला आहे.

बंटी शेळके सातत्याने आपण संघाच्या मुख्यालया जवळ राहतो. त्यांनी संघ मुख्यालयासमोर लोटांगण आंदोलन केले. यावरून तेच संघाचे एजंट दिसतात असाही आरोप काँग्रेसच्या तसेच मध्य नागपूरच्या काही पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. आज त्याला मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे(Congress) पदाधिकारी व ज्येष्ठ कार्यकर्त्यांनी प्रत्युत्तर दिले. ज्या काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली ते निवडणुकीच्या प्रचारात आम्हाला कधीच दिसले नाही असे त्यांनी सांगितले.

काँग्रेसच्या उद्योग व व्यापार आघाडीचे प्रदेश अध्यक्ष अतुल कोटेचा राहतात त्या 168क्रमांकाच्या बुथवर भाजपला 500 तर काँग्रेसला फक्त 88 मते मिळाली. यावरून कोटेचा यांनी कामच केले नसल्याचे स्पष्ट होते. मध्य नागपूरमधील सर्व पदाधिकारी पश्चिम नागपूरमध्ये विकास ठाकरे यांच्या प्रचारात होते. नाना पटोले(Nana Patole) यांच्या सांगण्यावरून त्यांनी आपला मतदारसंघ सोडला. नॅश अली यांचे पक्षात काहीच योगदान नसताना त्यांना महिला काँग्रेसचे अध्यक्षपद देण्यात आले होते. आसिफ कुरेशी, हैदरअली दोसानी हे स्वतःला मोठे नेते समजतात. त्यापैकी एकानेही काम केले नाही. नाना पटोले अध्यक्ष झाल्यापासून नागपूरमध्ये दोन गट पडले आहेत असा आरोप यावेळी बंटी समर्थक मध्य नागपूरमधील काँग्रेसचे पदाधिकारी तौसिफ खान, फरफान खान, सहदेव गोस्वावी, नाना दुरुगकर, स्वप्नील ढोके आदींना पत्रकार परिषद घेऊन केला.

काँग्रेसचे माजी नगरसेवक रमेश पुणेकर यांनी बंडखोरी केली. पत्रकार परिषद घेणारे अनेक पदाधिकाऱ्यांनी उघडपणे त्यांचा प्रचार केला. त्यांना पटोले यांनी कारणेदाखवा नोटीस बाजवलेली नाही. बंटी शेळके यांचे काम करू नका असेही अनेकांना बजावण्यात आले होते. याचे सर्व पुरावे राहूल गांधी आणि काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT