Bunty Shelke News : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एजंट असा थेट आरोप लावणारे मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे पराभूत उमेदवार आणि युवक काँग्रेसचे राष्ट्रीय महासचिव बंटी शेळके यांनी काँग्रेसच्या नेत्यांची चांगलीच झोप उडवली आहे. देवडिया भवनाला कुलूप लावून त्यांना काँग्रेस भवनात शिरू देण्यात आले नसले तरी फुटपाथवर शेकडो कार्यकर्त्यांची बैठक घेऊन त्यांनी काँग्रेस नेत्यांना उघड आव्हान दिले आहे.
बंटी शेळके यांचा अवघ्या दहा हजार मतांच्या फरकांनी पराभव झाला आहे. नाना पटोले आणि त्यांच्या समर्थकांनी काँग्रेस ऐवजी भाजपच्या उमेदवाराला मदत केली. संघाच्या मुख्यालया असलेल्या मतदारसंघातून निवडून आल्यास आपले राजकीय वजन वाढेल याची चिंता त्यांना लागली होती. त्यामुळे पटोलेंनी एकाही पदाधिकाऱ्याला प्रचारात पाठवले नाही, असा आरोप शेळके यांनी केला होता.
प्रियंका गांधी यांच्या रोड शोलासुद्धा काँग्रेसचे नेते गैरहजर होते, असा शेळके यांनी प्रदेशाध्यक्षांवर आरोप केला होता. त्यावर काँग्रेसने त्यांना कारणेदाखवा नोटीस बजावली आहे. आज बंटी शेळके यांनी मध्य नागपूर विधानसभा मतदारसंघातून महापालिकेची निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्यांची बैठक देवडिया काँग्रेस भवनात बोलावले होती. ब्लॉक अध्यक्षांनी सोशल मीडियावर बैठकीते निमंत्रण पाठवले होते. त्यानुसार दीडशे ते दोनशे कार्यकर्ते बैठकीसाठी उपस्थित झाले होते. मात्र देवडिया काँग्रेसभवनाला कुलूप होते.
कार्यालयात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्याने नेत्यांच्या सांगण्यावरून आपण कुलूप लावले आहे. त्यांच्या सुचनेशिवाय कार्यालय उघडता येणार नाही, असे शेळके यांना सांगितले. त्यामुळे फुटपाथवर बैठक घेण्यात आली. मध्य नागपूरचा उमेदवार मध्य नागपूरमधील कार्यकर्तेच ठरवतील. ज्येष्ठ नेत्यांची व ज्यांनी पक्षासाठी योगदान दिले त्यांनाचा महापालिकेच्या उमेदवार निवडण्याचे अधिकार यावेळी देण्यात आले.
या बैठकीला काही माजी नगरसेवक व काँग्रेसचे ज्येष्ठ कार्यकर्ते उपस्थित होते. ही बैठक म्हणजे थेट प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शहर काँग्रेसचे अध्यक्ष व आमदार विकास ठाकरे यांना आव्हान मानले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.