
Sushma Andhare Tweet News : विधानसभा निवडणुकीमध्ये महायुतीला प्रचंड अस बहुमत मिळाला आहे. यानंतर महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये जागा वाटपाचे खल सुरू आहेत. मात्र अद्याप त्यावर तोडगा निघाला नसल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे निवडणुकांचा निकाल लागून आठवडा झाल्यानंतर देखील अद्याप सरकार स्थापन होऊ शकले नाही. सरकार स्थापन करण्याच्या दृष्टिकोनातून महायुतीतील राज्यातील तिन्ही वरिष्ठ नेते दिल्लीमध्ये जाऊन भाजपच्या वरिष्ठ नेत्यांसोबत बैठक देखील करून आले. मात्र त्यानंतर देखील अद्याप महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण असणार याबाबत स्पष्टता आलेली नाही.
सुरुवातीच्या काळामध्ये महायुतीमध्ये एकनाथ शिंदे(Eknath Shinde) हे मुख्यमंत्रिपदावर अडून बसले असून त्यांना मुख्यमंत्रिपद मिळत नसल्याने ते नाराज असल्याचं सांगितलं जात होतं. मात्र नंतर एकनाथ शिंदे यांनी समोर येत दिल्लीतील भाजपचे वरिष्ठ जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असल्याचे सांगितलं. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाचा दावा सोडला असल्याचं बोललं जात आहे.दरम्यानच्या काळात भाजपकडून शपथ विधीचा मुहूर्त देखील जाहीर करण्यात आला त्यामुळे लवकरच मुख्यमंत्रिपदाचा देखील चेहरा जाहीर होईल असं बोललं जात होतं. मात्र अद्याप मुख्यमंत्री कोण असणार याबाबतचा सस्पेन्स कायम आहे.
तर दुसरीकडे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्याकडे गृहमंत्री आणि विधानसभा अध्यक्षपद आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रही असल्याचे समोर आला आहे. त्यामुळे मुख्यमंत्रिपद नाहीतर किमान ही दोन पद तरी आपल्याकडे असावीत यांसाठी शिंदे प्रयत्न करत असून याबाबत सध्या महायुतीच्या मित्र पक्षांमध्ये चर्चांचे खल सुरू आहेत. या सत्ता संघर्षावरून महाविकास आघाडीतील नेते सातत्याने एकनाथ शिंदे आणि भाजपवर(BJP) निशाणा साधताना पाहायला मिळत आहेत.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत(Sanjay Raut) हे सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या वर टीका करत आहेत. याबाबत प्रतिक्रिया देताना शिंदेंच्या शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी राऊत आगीत तेल ओतत असल्याची प्रतिक्रिया दिली होती. यावरून आता सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सोशल मीडिया वर पोस्ट करत सुषमा अंधारे म्हणाल्य, 'आमदार गुलाब पाटील ज्याअर्थी म्हणताहेत की संजय राऊत आगीत तेल टाकत आहेत. याचाच दुसरा अर्थ, "रान पेटलंय" हे गुलाब पाटील मान्य करत आहेत. गुलाबराव 5 तारखेपर्यंत आग विझवण्याचे प्रयत्न करा. नाहीतर ज्यांच्या जीवावर सुरत-गुवाहाटी केलं तेच EDचा दोरखंड सुद्धा आवळू शकतात.'
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.