Uddhav Thackeray and Nana Patole Sarkarnama
विदर्भ

Nana Patole On Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंनी घोषणा करून योग्य नाही केले !

BJP did not pay income tax : गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने निवडणुकीसाठी पैसे घेतले. भाजपने आयकरही भरला नाही. मग त्यांचे खाते का गोठवले नाही.

सरकारनामा ब्यूरो

Nana Patole On Uddhav Thackeray : लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने अद्याप सर्व उमेदवारांची घोषणा केलेली नाही. महाविकास आघाडीत वाटाघाटी सुरू असल्याने घोषणा करण्यास विलंब झाला असल्याचे सांगण्यात येते. पण आज सायंकाळपर्यंत उमेदवारांची यादी जाहीर करू, असे कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांनी सांगितले.

नागपुरात आज (ता. 22) नाना पटोले पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सांगलीच्या बाबतीत अजूनही चर्चा सुरू आहे. त्यांनी जाहीर केलं, तरीही चर्चेतून मार्ग निघेल. आघाडीत वाटाघाटी सुरू असताना जागा जाहीर करणे योग्य नाही. पण उद्धव ठाकरे यांनी तशी घोषणा केली. ते त्यांनी योग्य केले नाही. पण त्यावरही आम्ही काहीतरी मार्ग काढू. शेवटी आघाडीत लढायचे म्हटले की तडजोडी कराव्या लागतात. त्या आम्ही करत आहोत.

आज लोकशाहीचा मूळ प्रश्न आहे. कॉँग्रेसचं खातं सील करणं हा लोकशाहीवरचा हल्ला आहे. विरोधी पक्षाकडे पैसे राहू नये आणि बाॅंडच्या माध्यमातून पैसे गोळा करायचे, हा कार्यक्रम भाजपने राबवला आहे. गोमांस निर्यात करणाऱ्या कंपन्यांकडून भाजपने निवडणुकीसाठी पैसे घेतले. भाजपनेही आयकरही भरला नाही, मग त्यांचे खाते का गोठवले नाही. आयटी हा नवा कार्यकर्ता भाजपचा आलाय, हिंमत असेल तर आयकर विभागाने भाजपचे खाते गोठवावे, असे पटोले म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आज चंद्रपूरबाबत स्पष्टता होईल. दोन नावं चर्चेत आहेत. यात विजय वडेट्टीवार आणि प्रतिभा धानोरकर यांच्या नावांवर चर्चा आहे. शिवानी वडेट्टीवार की विजय वडेट्टीवार याबाबत हायकमांड निर्णय घेईल. तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे, तो चंद्रपूर मतदारसंघाच्या त्यांनी वापरला. पक्षाने आदेश दिला तर भंडारा-गोंदियातून निवडणूक लढवेल. नाही तर जो उमेदवार आमचा उमेदवार असेल, त्याला पूर्ण शक्तीने निवडून आणू.

रामटेक मतदारसंघात उमेदवारीचा तिढा अद्याप सुटलेला नाही. तेथे तिकीट मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. कोण येणार, कोण जाणार, यापेक्षा लोकशाही महत्त्वाची आहे. ती टिकवण्यासाठी काँग्रेस काम करत आहे. भाजपच्या नेत्यांना धडकी भरेल, असे प्लान आम्ही तयार करतोय. दिल्लीचे मुख्यमंत्री असलेल्या अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केली आहे. हा प्रकार लोकशाहीसाठी घातक आहे. राज्यात भ्रष्टाचार करणारे त्यांच्या मांडीला मांडी लाऊन बसले आहेत, असा घणाघात पटोलेंनी केला.

वंचित बहुजन आघाडीसोबतची चर्चा कुठवर आली असे विचारले असता, वंचितसोबत चर्चा सुरू आहे. त्यावर काय निर्णय झाला, हे येत्या दोन दिवसांत कळेल. सोलापूरमध्ये कॉंग्रेस नेत्या प्रणिती शिंदे यांच्यावर भ्याड हल्ला करण्यात आला. कारण तेथील भाजप नेत्यांच्या पायाखालील वाळू सरकली आहे. त्यामुळे भिऊन जाऊन भाजपने त्यांच्यावर हल्ला करवल्याचा आरोप नाना पटोले यांनी केला.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT