Nana Patole At Pratapgad : प्रतापगडावर काय घडले? डॉ. पडोळेंच्या खांद्यावर नानांचा 'हात'?

Bhandara-Gondia : नाना इतर इच्छुक उमेदवारांना काही सूचक इशारा तर देत नाहीत ना, याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.
Dr. Prashant Padole, Nana Patole and Others
Dr. Prashant Padole, Nana Patole and OthersSarkarnama
Published on
Updated on

Nana Patole At Pratapgad : देशात लोकसभा निवडणुकीचा माहौल रंगात आला आहे. पुढील आठवड्यात आचारसंहिता घोषित होण्याची शक्यता आहे. भाजपने 195 उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली असून, भंडाऱ्यातून कोणाला संधी मिळणार, हे अद्याप अनुत्तरित आहे. दरम्यान, भाजपने उमेदवार घोषित केल्यानंतरच काँग्रेस भंडाऱ्यात उमेदवार घोषित करणार असल्याची विश्वसनीय माहिती आहे.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना हातात उमेदवार निवडीचे सर्वस्वी अधिकार असल्याने नानांना खूष करण्यासाठी इच्छुक उमेदवार नानांना गराडा घालत असल्याचे पाहायला मिळते आहे. दरम्यान, नाना पटोले यांनी भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी एका इच्छुक उमेदवाराच्या खांद्यावर 'हात' ठेवून फोटोसेशन केल्याने नाना इतर इच्छुक उमेदवारांना काही सूचक इशारा तर देत नाहीत ना, याची चर्चा आता जिल्ह्यात रंगली आहे.

महाशिवरात्रीनिमित्त काल मोरगाव अर्जुनीमधील प्रतापगडावर यात्रा भरली होती. या यात्रेला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हजेरी लावली होती. नाना पटोले येणार म्हणून नानांना खूष करण्यासाठी भंडारा-गोंदिया लोकसभेसाठी इच्छुक काँग्रेस उमेदवारांनी प्रतापगडावर एकच गर्दी केल्याची पाहायला मिळाली. या वेळी नाना पटोले यांनी इच्छुक उमेदवार डॉ. प्रशांत पडोळे यांच्या खांद्यावर 'हात' ठेवून फोटोसेशन केल्याने नानांनी इतर इच्छुक उमेदवारांना उमेदवार निवडल्याची सूचना दिली असल्याची चर्चा आता रंगू लागलेली आहे. या फोटोसेशनची इतर उमेदवारांमध्ये दहशत पाहायला मिळते आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Dr. Prashant Padole, Nana Patole and Others
Nana Patole : ‘औकात’वरून भिडले नाना; प्रफुल पटेलांना दिले थेट आव्हान !

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघासाठी उमेदवार निवडीचा तिढा काँग्रेससाठी अद्याप कायम आहे. भाजपला टक्कर देऊ शकेल, अशाच उमेदवाराला नाना पटोले उमेदवारी देणार, हे ठरलेले आहे. इच्छुकांच्या यादीत डॉ. प्रशांत पडोळे, भंडारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई आणि अजून एका डॉक्टरचे नाव समोर येत आहे. यात काँग्रेस जिल्हाध्यक्ष मोहन पंचभाई यांच्या नावाला अंतर्गत विरोध सुरू झाला आहे. दुसरीकडे अजून एका डॉक्टरच्या नावासमोर इच्छुकांच्या यादीत निशाण असले तरी पत्नी जिल्हा परिषद सदस्य आहे. याव्यतिरिक्त काँग्रेसमध्ये त्यांचे विशेष काम दिसून येत नाही.

नवख्या माणसाला अचानक उमेदवारी देऊन भाजपच्या गळ्यात आयाती माळ घालण्याचे काम नाना पटोले कदापि करणार नाहीत, असे राजकीय जाणकार सांगत आहेत. या सर्व घडामोडींत नाना पटोले यांनी डॉ. प्रशांत पडोळे यांच्यासोबत प्रतापगडावर केलेले फोटोसेशन चर्चेत आले आहे. डॉ प्रशांत पडोळे हे जुने कट्टर काँग्रेसी यादवराव पडोळे यांचे सुपुत्र आहेत. त्यामुळे त्यांना जुन्या काँग्रेसच्या नेत्यांचा भावनिक सपोर्ट मिळू शकतो, हे नानांनी हेरले असावे आणि त्यामुळे नानांनी डॉ. पडोळे यांच्या खांद्यावर 'हात' ठेवून इतरांना सूचित केल्याचे राजकीय जाणकार सांगतात.

Edited By : Atul Mehere

R

Dr. Prashant Padole, Nana Patole and Others
Nana Patole : अरेरे..! काल आंबेडकरांनी हाकलले, आज नानांनी दाखवला बाहेरचा रस्ता !

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com