Ashok Chavan Vs Ambadas Danve Sarkarnama
विदर्भ

Ashok Chavan Vs Ambadas Danve : आचारसंहितेतला 'आचार'ही कळत नाही; साडीवाटप वादावरून अशोक चव्हाणांचा दानवेंना टोला

Ashok Chavan hits back Ambadas Danve over BJP saree distribution event Nanded amid questions over election Model Code Conduct : नांदेडमधील भाजपच्या साडीवाटप कार्यक्रमावर अंबादास दानवेंनी प्रश्न उपस्थित केले. हा पक्षीय कार्यक्रम असल्याचे सांगत अशोक चव्हाण यांनी त्यांच्या टीकेला प्रत्युत्तर दिले.

Pradeep Pendhare

Nanded saree distribution row : नांदेडमध्ये भाजपच्या साडीवाटप कार्यक्रमावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. या कार्यक्रमावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी आचारसंहितेच्या मुद्द्यावरून टीका केली होती.

त्याला भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांनी प्रत्युत्तर दिले. ज्यांना आचारसंहितेतला आचारही कळत नाही, त्यांना बोलून काय फायदा? असा टोला चव्हाण यांनी दानवेंना लगावला.

शनिवारी नांदेडमध्ये भाजपच्या (BJP) वतीने ‘सेवा संकल्प अभियानां’तर्गत अंगणवाडी सेविकांच्या सन्मानासाठी साडीवाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाला खासदार अशोक चव्हाण यांचीही उपस्थिती होती. मोफत साड्या घेण्यासाठी महिलांची झुंबड उडाली. तसेच साडी मिळवण्यावरून महिलांमध्ये झटापट झाल्याचे चित्र दिसून आले.

या कार्यक्रमावरून अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनी समाजमाध्यमांवर पोस्ट करत टीका केली. पदवीधर मतदारसंघाची आचारसंहिता लागू असताना राजकीय कार्यक्रमाच्या माध्यमातून साड्यांचे वाटप कसे सुरू आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आचारसंहितेच्या नियमांत सत्ताधाऱ्यांना सूट दिली आहे का, अशी विचारणाही त्यांनी केली. याशिवाय, या कार्यक्रमाचा खर्च संबंधित उमेदवाराच्या निवडणूक खर्चात समाविष्ट करण्यात आला आहे का, असा सवालही दानवे यांनी उपस्थित केला.

अंबादास दानवे यांच्या टीकेला उत्तर देताना अशोक चव्हाण यांनी हा भाजपचा पक्षीय कार्यक्रम असल्याचे स्पष्ट केले. या कार्यक्रमात सरकारची कोणतीही भूमिका नव्हती. फक्त पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते, असे त्यांनी सांगितले. कार्यक्रमात कोणतीही घोषणा करण्यात आली नाही. तसेच कोणताही मंत्री उपस्थित नव्हता, असेही चव्हाण म्हणाले. आम्ही केलेली मागणी ही केवळ मागणी असू शकते; मागणी करणे हा आचारसंहितेचा भंग ठरतो का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

साडीवाटप किती मतदार, मग बोलावे

दानवेंवर टीका करताना चव्हाण यांनी आचारसंहितेच्या मुद्द्यावरून त्यांना लक्ष्य केले. ज्यांना आचारसंहितेतला 'आचार'ही कळत नाही, त्यांना बोलून काय फायदा? असे ते म्हणाले. साडीवाटप कार्यक्रमात किती मतदार आहेत, हे आधी पाहावे आणि त्यानंतर या विषयावर बोलावे, असे आव्हान त्यांनी दिले.

निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची

दरम्यान, साडीवाटप कार्यक्रमावरून उपस्थित झालेल्या प्रश्नांमुळे निवडणूक आचारसंहिता आणि राजकीय पक्षांच्या कार्यक्रमांबाबतचा वाद चर्चेत आला आहे. या प्रकरणात आचारसंहितेचे उल्लंघन झाले आहे का? हे ठरवण्यासाठी संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांची भूमिका आणि लागू नियम महत्त्वाचे ठरणार आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT