Shiv Sena Symbol Case : शिवसेना कुणाची? धनुष्यबाणाचा फैसला दिवाळीनंतरच? असीम सरोदे यांचा अंदाज

Asim Sarode expects the Shiv Sena verdict may come after Diwali as Supreme Court arguments continue : उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटांमधील संघर्षावर सर्वोच्च न्यायालयात ज्येष्ठ वकिलांचे युक्तिवाद होणार; सुनावणी आणि अंतिम निकालाच्या वेळेबाबत सरोदे यांनी व्यक्त केला अंदाज.
Shiv Sena Symbol Case
Shiv Sena Symbol CaseSarkarnama
Published on: 
Updated on: 

Shiv Sena Case : शिवसेना पक्ष आणि धनुष्य बाण चिन्ह उद्धव ठाकरेंचे की, एकनाथ शिंदेंचे, याचा फैसला दिवाळीनंतरच होईल, असा अंदाज विधिज्ञ असीम सरोदे यांनी व्यक्त केला आहे.

परंतु या दरम्यान सर्वोच्च न्यायालयात दोन्ही बाजूने कायद्यावरून घमासान होईल. सात ज्येष्ठ वकील आपापली बाजू मांडत, शिवसेना कुणाची यावर युक्तिवाद करतील, अशी माहिती असीम सरोदे यांनी दिली.

शिवसेना कुणाची? सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीच्या सुरूवातीपासून, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावतीने विधिज्ञ असीम सरोदे न्यायालयात उभे आहेत. या खटल्याचा निकाल कधीपर्यंत येईल, यावर त्यांनी, एक्सवर पोस्ट शेअर करत दिवाळीनंतरचा अंदाज वर्तवला आहे.

30 ऑक्टोबर 2026 पर्यंत शिवसेना (Shivsena) पक्ष, पक्षचिन्ह धनुष्यबाण आणि अपात्रता याबाबतची सुनावणी संपेल आणि दिवाळीपूर्वी निकाल लागेल, असा अंदाज होता. परंतु कदाचित दिवाळीनंतरच निकाल लागेल, असे आता वाटत आहे, असे असीम सरोदे यांनी म्हटले.

Shiv Sena Symbol Case
Karnataka Congress : कर्नाटक काँग्रेसला मोठा धक्का? 25 आमदार भाजपच्या संपर्कात; विजयेंद्रांचा दावा

राहुल नार्वेकरांचा वकील देखील करणार युक्तिवाद

ज्येष्ठ वकील नीरज किशन कौल एकनाथ शिंदे शिवसेनेतर्फे युक्तिवाद केल्यानतंर, आता ज्येष्ठ वकील ध्रुव मेहता पक्षचिन्हाबाबत युक्तिवाद करतील, ज्येष्ठ वकील मणिंदरसिंग हे अपात्रतेबाबत म्हणणे मांडतील, ज्येष्ठ वकील शेषाद्री नायडू हे विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची बाजू मांडतील. अरविंद दातार केंद्रीय निवडणूक आयोगाची बाजू मांडणातील आणि त्यानंतर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी पक्षचिन्हावर युक्तिवाद करणार आहे.

Shiv Sena Symbol Case
Delhi Metro Seat Dispute : दिल्ली मेट्रोतील मारहाणीत एकाचा मृत्यू, निवृत्त IAS अधिकारी अन् मुलाला अटक; नेमकं काय घडलं?

कपिल सिब्बल यांचा युक्तिवाद ठरणार 'की'

16 जणांच्या विरोधातील प्राथमिक अपात्रतेची याचिका असल्याने कुणी चार, तर कुणी पाच आमदारांकडून युक्तिवाद करणार आहे. त्यामुळे युक्तिवादासाठी सर्वोच्च न्यायालयाला प्रत्येकाला वेळ द्यावा लागणार आहे. ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांना वाटते की, सगळ्यांचा युक्तिवादानंतर त्यांना एकत्रित विचार करून तयारी करायला वेळ लागेल आणि नंतर ते एका दिवसात सगळ्यांना उत्तर देणारा शेवटचा युक्तिवाद करतील, असा अंदाज आहे.

...तर दिवाळीनंतरच अंतिम निकाल!

या सर्व युक्तिवादांचा आणि न्यायालयीन प्रक्रियेचा विचार केल्यावर, न्यायालयाला सलग दुपारी 2.30 नंतरचा संपूर्ण वेळ दररोज या प्रकरणासाठी दिला नाही, तर दिवाळीनंतरच अंतिम निकाल लागेल असेच दिसते, असे असीम सरोदे यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com