navneet rana bacchu kadu.jpg sarkarnama
विदर्भ

VIDEO : बालेकिल्ल्यात जाऊन बच्चूभाऊंवर नवनीत राणांचे 'कडू'वार; बरंच काही बोलून गेल्या...

Akshay Sabale

लोकसभा निवडणुकीत झालेला पराभव नवनीत राणा यांच्या जिव्हारी लागला आहे. 'प्रहार'चे अध्यक्ष, बच्चू कडू यांनी महायुतीतून फारकत घेत दिनेश बूब यांना अमरावतीतून उमेदवारी दिली होती. दिनेश बूब यांनी 76 हजार मते घेतल्यानं नवनीत राणा यांना पराभवाला सामोरे जावे लागले.

नवनीत राणा यांना वीस हजारांच्या आसपास मतांनी बळवंत वानखेडे यांनी पराभूत केलं. ही सल अजूनही नवनीत राणा यांना सलत आहे. यातच नवनीत राणा यांनी बच्चू कडू ( Bacchu Kadu ) यांना सुपारीबहाद्दर, ढोंगी, नाटकबाज म्हणत टीका केली आहे.

अचलपूर विधानसभा मतदारसंघात जाऊन नवनीत राणा ( Navneet Rana ) यांनी थेट बच्चू कडू यांच्यावर 'तिखट' शब्दांत हल्ला केला आहे. त्यामुळे आगामी काळात नवनीत राणा विरुद्ध बच्चू कडू असा वाद विकोपाला जाण्याची शक्यता आहे. नवनीत राणा दहिहंडिच्या कार्यक्रमात बोलत होत्या.

नवनीत राणा म्हणाल्या, "काही भाऊ पाडण्याची सुपारी घेतात. हे तोडपाणीबहाद्दर, ब्लॅकमेलर, ढोंगी आणि नाटक करणारे तुम्हाला माहिती आहे ना? माझा निवडणुकीत पराभव झाला नाहीतर जिल्हा 10 वर्षे मागे गेला आहे. यासाठी सुपारीबाजांनी सुपारी घेतली होती."

"या जिल्ह्यात मेडिकल कॉलेज, टेक्सटाईल पार्क मी आणलं. अचलपूर जिल्हा जोपर्यंत होत नाही, तोपर्यंत शांत बसणार नाही. निवडणुकीत पराभूत झाली आहे, श्वास अजूनही जिवंत आहे. शेवटच्या श्वासापर्यंत जिल्हा होण्यासाठी काम करत राहणार," असं राणा यांनी म्हटलं.

"ढोंगी, नाटकी, सुपारीबहाद्दूर 40 वर्षांपासून अचलपूर मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करत आहेत. त्या सुपारीबहाद्दूरानं तुम्हाला रोजगार दिला का? त्यामुळे बहिणीच्या पराभवाचा तुम्ही हिशोब घेणार ना?" असा सवाल नवनीत राणांनी उपस्थितांना केला.

"20 वर्षांत एकही उद्योग अचलपूर मतदारसंघात आला नाही. 'एमआयडीसी'त एकही कंपनी आली नाही. फिनले मिल हे मंत्री असताना बंद झाली. मिलही करू शकले नाहीत. हे गारूडी, ढोंगी, सुपारीबहाद्दूर सचिन तेंडूलकरच्या घरासमोर आंदोलन करतात," अशी टीका नवनीत राणांनी बच्चू कडूंवर केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT