Navneet Rana Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana : उद्धव यांच्या कट्टर विरोधक नवनीत राणांच्या ठाकरे बंधूंना शुभेच्छा; सोबत आले, तर कुणी 'कांटा' बनणार नसल्याची दिली ग्वाही

Amravati BJP Navneet Rana reaction reunion Uddhav and Raj Thackeray : शिवसेना उद्धव ठाकरे आणि मनसेचे राज ठाकरे यांच्या युतीच्या चर्चेवर भाजपच्या माजी खासदार नवनीत राणा यांनी प्रतिक्रिया दिली.

Pradeep Pendhare

Maharashtra politics 2025 : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या युतीच्या प्रस्तावावरून अवघा महाराष्ट्र ढवळून निघू लागला आहे. भाजप महायुतीमधून या युतीवर प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत.

उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेविरुद्ध पंगा घेतलेल्या भाजप माजी खासदार नवनीत राणा यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. युतीसाठी शुभेच्छा देताना, दोघं सोबत येत असतील, तर कुणी कांटा बनणार नाही, अशी ग्वाही देखील नवनीत राणा यांनी दिली.

भाजपच्या (BJP) नवनीत राणा म्हणाल्या, "परिवार संपूर्ण देशासमोर आला, तो वाद बाहेर आणणारे कोण होते, ते आम्हाला माहित होते. राजकारणी व्यक्ती कमी, पण एका कुटुंबात राहणारी व्यक्ती म्हणून आम्ही त्या दोघांना शुभेच्छा देतो. ते जर सोबत येत असतील, तर त्यांच्यामध्ये कुणी कांटा बनणार नाही". हिंदुत्ववादाची लढाई भगव्यासाठीच राहणार आहे, असेही राणा यांनी ठासून सांगितले.

ठाकरे बंधू मराठीच्या मुद्यावर एकत्र येत आहे, त्यावर बोलताना नवनीत राणा यांनी महाराष्ट्रात (Maharashtra) जन्माला आलो, महाराष्ट्राची माती डोक्याला लावलीय, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचारांवर आम्ही चाललो आहोत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमुळे त्यांचे उतू-उतू जे विचार बाहेर येतात, त्यावर मी जास्त बोलणार नाही, असे सांगितले.

भाजप हिंदुत्वासाठी लढत आहे, एवढं प्रेम असेल, तर पश्चिम बंगालमध्ये हिंदूंवर अन्याय, अत्याचार होत आहेत. तेथून हिंदू गाव सोडून बाहेर चालला आहे, त्याच्यावर त्यांनी बोलावं. छत्रपती शिवाजी महाराज लढले, भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर सर्वसामान्यांसाठी लढले, तेव्हा देश, राष्ट्र, राज्य प्रथम ठेवला. भाजप त्यावरच काम करते आहे, कोणता एक विचार घेऊन काम करत नाही, असे नवनीत राणा यांनी सांगितले.

राज ठाकरे यांच्या हिंदू आहोत, हिंदी नाही, या टिप्पणीवर बोलताना नवनीत राणा यांनी भाषणा गर्दी होऊ शकते, पण जेव्हा डब्ब्यात मत पडतात, तेव्हा विचार करून, मतदार मत टाकतात. ते विचार करून आपण आपले मत बाहेर ठेवले पाहिजे, असा टोला लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT