
Maharashtra political news : राज्याच्या राजकारणात उलथापालथ होणारी मोठी घडामोड घडत आहे. मनसे आणि शिवसेनामध्ये युतीचे संकेत मिळत आहे. मनसेचे राज ठाकरे यांनी शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे युतीचा प्रस्ताव ठेवला आहे. या प्रस्तावाला उद्धव ठाकरे यांनी देखील सकारात्मक प्रतिसाद दिला.
राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधूंच्या युतीचे पडसाद उमटू लागले असून, भाजपकडून त्यावर प्रतिक्रिया सुरू झाल्या आहेत. भाजप मंत्री राधाकृष्ण विखे यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरून राजकारणामध्ये काही बदल होतं नाही. पूर्वी अनेकवेळा लोक एकत्र आले आणि बाजूला गेले. शेवटी लोकं महायुतीवरच विश्वास दृढ असेल, असे
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एकत्र येण्याच्या चर्चा असून राज यांनी उद्धव यांना प्रस्ताव देखील दिला आहे, त्याला फारस महत्त्व देण्याची आवश्यकता वाटत नाही, असे भाजप मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं. दरम्यान, शिवसेनेकडून खासदार संजय राऊत आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी दोन्ही पक्षाच्या भूमिका मांडल्या आहेत.
हिंदीच्या मुद्द्यावर सरकारची भूमिका मुख्यमंत्री यांनी स्पष्ट केलेली आहे. हिंदी आपण राष्ट्रभाषा म्हणून स्वीकारली आहे. त्यामुळे त्याच्यातून काही वेगळं राजकारण करून कोणी एकत्र येण्यानं राजकारणामध्ये काही बदल होतं नाही. पूर्वी अनेकदा लोक एकत्र आले आणि बाजूला गेले, शेवटी लोकांनी महायुतीला (Mahayuti) विश्वास दृढ केलेला आणि त्यामुळे कोणी एकत्र आल्याने यात काही बदल होईल, असे वाटत नाही, असे मंत्री विखे पाटील यांनी म्हटले.
मंत्री राधाकृष्ण विखे यांनी राज्यातील पाणी टंचाईवर बोलताना, राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचा प्रश्न उद्भवत आहे. मुबंईमध्ये टँकरची अडचण होती. मात्र बुधवारी कृष्णा खोरे आणि गोदावरी खोऱ्यातील सगळ्यां अधिकाऱ्यांना बोलावलं आहे आणि आम्ही धरणाच्या पाणीसाठ्याचा, धरणाच्या उपलब्धतेचा तसेच धरणाच्या पाण्याचा गैरवापर होतं असेल, तर त्यावर तात्काळ कारवाईच्या सूचना देणार असल्याचे सांगितले.
पिण्याचा पाणी हे आमच्या दृष्टीने प्राथमिकता आहे, त्यामुळे पाण्याचा गैरवापर होतं असेल, तर त्याला अटकाव करण्यात येणार आहे, कारण पुढचे तीन महिने अतिशय महत्त्वाचे असून त्यानुसार आमच्या खात्याने पाऊले उचलली आहेत, असेही मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.