Navneet Rana BJP Candidature
Navneet Rana BJP Candidature Sarkarnama
विदर्भ

Navneet Rana Amravati BJP Candidature : नवनीत राणा कमळ चिन्हावर लढणार; उमेदवारी मिळताच भाजप प्रवेशासाठी रवाना...

Chetan Zadpe

Mumbai Political News : भारतीय जनता पार्टीने लोकसभा उमेदवारांची सातवी यादी प्रसिद्ध केली आहे. राज्यांच्या जागेसाठी ही तिसरी यादी आहे. यामध्ये महाराष्ट्रातील अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे आता नवनीत राणा या भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार हे स्पष्ट झाले आहे.

मोदी-शाह यांचे आभार - राणांची प्रतिक्रिया -

माझ्यावर विश्वास दाखवून उमेदवारी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे (Narendra Modi) जाहीर आभार व्यक्त करते. अमरावतीच्या लोकांनी मला इथपर्यंत आणलं. अमरावतीची जनता नेहमी विकासासोबत राहिली आहे. मोदीजी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मी मनापासून धन्यवाद देते.

भाजपची सातवी यादी -

भाजपने लोकसभा (Lok Sabha) उमेदवारांची सातवी यादी जाहीर केली आहे. यामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील दोन जागांसाठी उमेदवारी जाहीरे केली आहे. विशेष म्हणजे या दोन्ही जागा अनिसूचित जागांसाठी राखीव आहेत.

अमरावती लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार नवनीत राणा यांना, तर कर्नाटकमधील चित्रदुर्ग लोकसभा मतदारसंघातून गोविंद करजोल यांना उमेदवारी दिली आहे.

R

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT