Nagpur News : छत्रपती शंभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित छावा चित्रपट चांगलाच गाजत आहे. सोबतच अनेक वादही राज्यात निर्माण झाले आहे. छत्रपतींचा अपमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला 17 दिवसांची पोलिस कोठडी यामुळे भोगावी लागली. आता यात महात्मा ज्योतिराव फुले यांचे जीवनावर आधारित सिनेमाची भर पडली आहे. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) हा चित्रपटाची दृश्यांवर कात्री लावू नये आणि तो टॅक्स फ्री करण्याची मागणी केली आहे.
महात्मा फुले चित्रपटातील काही दृष्यांवर आक्षेप घेण्यात आला आहे. ब्राम्हणाची बदनामी या चित्रपटातून केली जात असल्याचे सांगण्यात येते. स्वतः माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनीसुद्धा हे मान्य केले आहे. या विरोधात शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने भूमिका घेतली आहे.
प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सेन्सॉर बोर्ड फक्त विशिष्ट चित्रपटांना कात्री लावत असल्याचा आरोप केला आहे. हाच धागा पकडून नागपूरमध्ये झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत कुठलीही सेन्सॉर शीप न करता जसा आहे तसाच चित्रपट प्रदर्शित करण्याची मागणी करण्यात आली.
महात्मा फुले जयंतीनिमित्त अभिवादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष तसेच प्रदेश प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी शुक्रवारी (ता.11) पक्ष कार्यालयात बैठक आयोजित केली होती. याच बैठकीत राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी कर्जमुक्ती वरून शेतकऱ्यांबद्दल अवमानजनक वक्तव्य केल्याबद्दल निषेध करण्यात आला. तसेच त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या निर्देशानुसार प्रत्येक प्रत्येक महिन्याचे दुसऱ्या आठवड्यात जिल्हा कार्यकारिणीची बैठक घेण्यात आली. त्यानुसार आज तालुकानिहाय पक्ष संघटनेचा आढावा घेऊन आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती ,नगर पालिका व नगर पंचायत निवडणूक मजबुतीने लढविण्याचे रणनितीवर विस्तारपूर्वक चर्चा करण्यात आली.
या प्रसंगी प्रामुख्याने प्रदेश सरचिटणीस अनिल साठोने, महिला जिल्हाध्यक्ष डॉ.वैशाली टालाटुले, रश्मी जामदार, सारिका ढोमणे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.