
Hingoli News : पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दहा लाखांचं डिपॉझिट न भरल्यानं उपचार न केल्यामुळे एका गरोदर महिलेचा मृत्यू झाला होता. यावरुन आरोप-प्रत्यारोपांनी राजकीय वातावरण तापलं आहे. तसेच महिलेच्या मृत्यूला रुग्णालयच कारणीभूत असल्याचा आरोप केला जात आहे. यात दुसरी एक धक्कादायक घटना मराठवाड्यात उघडकीस आली आहे.
हिंगोलीत डेंग्यू झालेल्या रुग्णाला रुग्णालयाला 6 लाखांचं बिल पाठवल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या घटनेवर शिंदे गटाचे आमदार संतोष बांगर (Santosh Banger) यांना संताप अनावर झाला. त्यांनी डॉक्टरांची चांगलीच झाडाझडती घेतली. बांगर म्हणाले,रुग्णाची कंडिशन कशीही असो,पण सहा लाखांचं बिल देऊन, त्यांना लुटू नका.यासंबंधी एक ऑडिओ कॉल सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.
छत्रपती संभाजीनगर येथील एमजीएम रुग्णालयामध्ये हिंगोली जिल्ह्यातील आदिती सरकटे यांच्यावर डेंग्यू झाल्यानं उपचार सुरू होते. या उपचारादरम्यान त्यांना एकूण सहा लाखांचं बिल देण्यात आलं. डेंग्यूच्या रुग्णाला एवढं बिल कसं काय दिलं,असा सवाल करत आमदार संतोष बांगर यांनी डॉक्टरांना खडेबोल सुनावले. रुग्णाचं तुम्ही 6 लाखांचं बिल केलं,त्याला काय तुम्ही अमृत पाजलं का, असा संतप्त सवालही त्यांनी केला.
हिंगोलीचे शिवसेना आमदार संतोष बांगर यांची डॉक्टरांसोबतच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. त्यात बांगर डॉक्टरला म्हणतात, रुग्णाला 3 लाखांचं मेडिकल बिल आणि 2 लाख 85 हजारांची फी लावण्यात आली आहे. त्यांनी 1 लाख 80 हजारांचं बिल भरलंय.डेंग्यूच्या रुग्णाला एवढं बिल लावतात का?अशी विचारणा केली.
यावर डॉक्टर म्हणाले,रुग्ण दवाखान्यात (Hospital) भरती झाला, त्यावेळी त्याची परिस्थिती गंभीर स्वरुपाची होती. त्यामुळे त्याला व्हेंटिलेटरवर ठेवावं लागलं. याचमुळे रुग्णाचं एवढं बिल झालं.यानंतर बांगरांनी आपला भाऊही एमबीबीएस एमडी आहे, तुम्ही खोटं बोलू नका असं म्हणत डॉक्टरांना चांगलंच सुनावलं.
संतोष बांगर यांनी संबंधित डॉक्टरला तुम्ही एवढं मोठं हॉस्पिटल लोकांना लुटण्यासाठी बांधलंय का? असं सवालही केला. तसेच गोरगरीबाला लुटू नका,हात जोडून तुम्हाला विनंती करतो.या पद्धतीनं जर तुम्ही हॉस्पिटल चालवणार असाल तर आम्हालाही अॅक्शन घेण्याचा अधिकार आहे असा पवित्राही आमदार बांगर यांनी घेतला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.