Anil Deshmukh  sarkarnama
विदर्भ

Anil Deshmukh news : 'एक बाहुलं गेलं अन् दुसरं आलं'; अनिल देशमुखांनी महायुतीला 'डुप्लिकेट' म्हणत निवडणूक आयोगावरही तोफ डागली

NCP Sharad Pawar Party leader Anil Deshmukh Mahayuti government Election Commission political developments : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी अमरावती इथं पत्रकार परिषद घेत महायुती सरकारसह निवडणूक आयोगावर टीका केली.

Pradeep Pendhare

Maharashtra politics : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे नागपूरमधील नेते माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी महायुती सरकारसह निवडणूक आयोगावर जोरदार हल्ला चढवला.

"महायुतीचं सर्व काही डुप्लिकेट आहे. ईव्हीएम, मतदार याद्या आणि त्यातून मिळालेला विजय देखील डुप्लिकेट आहे. निवडणूक आयोग फक्त बाहुलं बनून राहिलं आहे. एक गेलं अन् दुसरं बाहुलं आलं, अशी त्याची सध्याची स्थिती आहे", असा घणाघात अनिल देशमुख यांनी केला.

राज्यात सध्या औरंगजेबच्या कबरीवरून वाद पेटला आहे. याच मुद्द्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (NCP) शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अमरावती इथं पत्रकार परिषद घेत राज्य सरकारवर गंभीर आरोप केला. विधानसभा निवडणुकीच्या काळात भाजप आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठे आश्वासनं दिले होते, याची आठवण अनिल देशमुखांनी करून दिली.

महायुती (Mahayuti) सरकार आलं, तर आम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी करू. आता चार महिने झाले आहेत, तरी शेतकरी कर्जमाफीची वाट पाहत आहेत. शेतकऱ्यांसाठी तुम्ही 20 हजार कोटी रुपये खर्च करू शकत नाहीत? असा हल्लोबोल अनिल देशमुख यांनी केला आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न गंभीर

शेतकरी, शेतमजूर, महिला अत्याचारांच्या प्रश्नावर लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी महायुतीकडून वेगवेगळी मुद्दे पुढं आणली जात आहे. सरकारकडून कापूस खरेदी बंद आहे, सोयाबीन आणि संत्राला भाव नाही, तर शेतकऱ्यांचे प्रश्न आहे, त्याकडे राज्य सरकारचे दुर्लक्ष आहे. औरंगजेबाची कबर उखडण्याचा मुद्दा त्यातूनच पुढे केला आहे, असा गंभीर आरोप अनिल देशमुख यांनी म्हटले.

लाडक्या बहिणी असुरक्षित

लाडक्या बहि‍णींसाठी 2100 रुपये देणार होते, ते केलंच नाही. मात्र या योजनेतून अनेक महिलांना वगळण्यात आलं आहे. राज्यात कायदा सुव्यवस्था ढासळली आहे. गुंडांना संरक्षण दिलं जात आहेत. लोकांचे जे प्रश्न आहेत, त्यांना वाच्या फोडण्यासाठी आम्ही जनतेपुढे जाणार आहोत, यासाठी संपूर्ण राज्यात लवकरच दौरा सुरू करणार असल्याचे अनिल देशमुख यांनी म्हटले.

'स्थानिक'च्या निवडणुका घ्या

महाराष्ट्रातील जनता प्रशासक राजला कंटाळली असून, महापालिका, जिल्हा परिषद, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेतल्या पाहिजेत. सरकार न्यायालयात कायद्याची बाजू मांडण्यात कमी पडत आहे का? असा सवाल अनिल देशमुखांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT