Trupti Desai : अजितदादांच्या नावाखाली बीडचं पालकत्व कोण संभाळतंय? तृप्ती देसाईंचा पालकमंत्रिपदावरून 'NCP'ला टोला (VIDEO)

Pune Trupti Desai Ajit Pawar Dhananjay Munde Beed police Walmik Karad : बीड जिल्ह्यातील पोलिसांचे वाल्मिक कराड हितसंबंधांचे पुरावे घेऊन गेलेल्या तृप्ती देसाई यांनी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यावर टीका केली.
Trupti Desai
Trupti DesaiSarkarnama
Published on
Updated on

Beed Police : बीड पोलिसांवर केलेल्या आरोपांनंतर तृप्ती देसाईंना नोटीस बजावली होती. त्या नोटिशीला उत्तर देण्यासाठी तृप्ती देसाई पुराव्यासह उत्तर देण्यासाठी बीड पोलिस अधीक्षक कार्यालयात गेल्या.

तिथं त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना बीडचे खरे पालकमंत्री कोण यावर मोठं विधान केले. अजित पवार यांच्या नावाने बीडचे खरे पालकत्व धनंजय मुंडे संभाळत आहेत, असा गंभीर आरोप तृप्ती देसाई यांनी केला.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या वाल्मिक कराड याचे बीड (BEED) पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्याशी असलेल्या हितसंबंधांवर गंभीर आरोप केले होते. या आरोपानंतर बीड पोलिसांनी तृप्ती देसाई यांनी नोटीस बजावली होती. केलेल्या आरोपांचे पुरावे द्या, असे त्यात म्हटले होते.

Trupti Desai
Financial Fraud Complaint : फडणवीसांचा आणखी एक मंत्री अडचणीत, सरकारला दोन कोटींना गंडवले? माजी आमदाराची थेट पोलिसांमध्ये तक्रार

तृप्ती देसाई आज हे सर्व पुरावे घेऊन बीड जिल्हा पोलिस दलात कार्यालयात पोचले होते. बीड पोलिस (Police) दल अन् वाल्मिक कराड यांच्या हितसंबंधांविषयीचे पुरावे असलेले पेनड्राईव्ह सुपूर्द केला. 26 पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांविषयी पुरावे तृप्ती देसाई यांनी पोलिस अधीक्षक नवनीत कावत यांच्याकडे दिला.

Trupti Desai
Nagpur Politics : दुष्यंत चतुर्वेदी उद्धव ठाकरेंच्या सैनिकांचा हिशोब चुकता करणार का?

महायुती सरकारने पालकमंत्रिपदाची नियुक्ती करताना, धनंजय मुंडे यांना प्रचंड विरोध झाला. यानंतर त्यांना संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणावरून मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वतःकडे घेतली. पण तृ्प्ती देसाई यांनी आज बीडमध्ये जाऊन अजित पवार नावाचे बीडचे पालकमंत्री आहेत, असा आरोप केला.

धनंजय मुंडे यांच्याकडे बीडचे पालकत्व आहे. आजही बीड पोलिस दलातील अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी वाल्मिक कराड याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत आहेत. बीडचे पालकमंत्री आजही राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. अजित पवार यांच्याकडे पालकमंत्रिपद असले, तरी ते कुठेही दिसत नाही. बीडमध्ये दररोज भयंकर घटना घडत आहेत. अजितदादा त्यावर काहीच बोलत नाही. त्यामुळे अजितदादांकडे पालकमंत्री आहे की, त्यांच्या नावाने धनंजय मुंडे कारभार संभाळत आहेत, हेच कळायला मार्ग नाही, असा टोला तृप्ती देसाई यांनी लगावला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com