Sharad Pawar, Sandeep Bajoriya Sarkarnama
विदर्भ

Sharad Pawar News : निवडणुकीच्या धामधुमीतच शरद पवारांना धक्का; पक्षात काहीच काम नसल्याचे सांगत बड्या नेत्याची सोडचिठ्ठी...

Sandeep Bajoriya resignation : विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार विदर्भातून निवडून आला नाही.

Rajesh Charpe

Yavatmal News : सध्या नगरपालिकेची धामधूम सुरू असतानाच शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संदीप बाजोरिया यांनी पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांनी पक्ष सोडण्याची घोषणा केली असून आपण सध्या कुठल्याच पक्षात प्रवेश करणार नाही, असे जाहीर केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र असताना त्यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेची उमेदवारी दिली होती. हे बघता ते आता दादांच्या राष्ट्रवादीत सामील होतील, असा अंदाज बांधला जात आहे.

अजितदादा आणि शरद पवार वेगवेगळे झाल्यानंतर बायोरिया यांच्याकडे कुठलीच जबाबदारी सोपवण्यात आली नव्हती. पक्षातर्फे अनेकदा आश्वासने देण्यात आली. मात्र ती फक्त घोषणाच ठरली. सध्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आपल्याला कुठलेच काम नाही, काम करण्यासाठी काहीच नसल्याचे सांगून त्यांनी राजीनामा देत असल्याचे सांगितले.

संदीप बायोरिया स्पष्टवक्ते म्हणून ओळखले जातात. जे काही बोलायचे ते तोंडावर बोलतात. त्यांचा सर्वत्र आदरयुक्त धाक आहे. ज्या पक्षात काम करण्याची संधी दिली जात नाही, त्या पक्षात राहण्यात काही अर्थ नाही, असे त्यांचे म्हणणे आहे. यवतमाळ जिल्ह्यात बाजोरिया यांचा मोठा प्रभाव आहे.

ऐन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या दरम्यान त्यांनी राजीनामा दिला आहे. हा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेससाठी मोठा धक्का मानला जातो. त्यांच्या राजीनाम्यामुळे अनेकांची राजकीय समीकरणे बिघडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील नोकर भरतीला स्थगिती द्यावी या आमदार बाळासाहेब मांगूळकर यांच्या मागणीला त्यांनी समर्थन दिले. बँक आधीच बुडीत आहे. त्यात नोकरभरती केल्याने कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मोठा बोझा बँकेवर पडेल. अलीकडेच जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तसेच सहकारी क्षेत्रातील प्रवीण देशमुख यांच्यासह काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी अजित दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा एकही आमदार विदर्भातून निवडून आला नाही. राज्यात महायुतीची पुन्हा सत्ता आल्यानंतर शरद पवारांचे राष्ट्रावादीचे एक एक साथीदार सोडून चालले आहे. यात आता संदीप बाजोरिया यांची भर पडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT