Bihar government update : बिहारमध्ये मोदी-शहांची खेळी; ताकद वाढलेल्या नितीश कुमारांसमोर दोन तगड्या नेत्यांना दिलं बळ

Samrat Choudhary Vijay Sinha Deputy CM : नितीश कुमार यांच्यासमोर या दोन्ही नेत्यांना भाजपचा वचक ठेवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे.
PM Modi, Nitish Kumar
PM Modi, Nitish KumarSarkarnama
Published on
Updated on

Bihar political update : बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यातील घडामोडींना वेग आला आहे. एनडीएने 202 जागांवर विजय मिळवत विरोधकांना भूईसपाट केल्यानंतरच आता नव्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. संयुक्त जनता दलाने नितीश कुमार यांची विधिमंडळ नेतेपदी निवड केली आहे. तेच गुरूवारी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. त्याचवेळी भाजपनेही बुधवारी मोठा निर्णय घेतला आहे.

जेडीयूपाठोपाठ भाजपच्या नवनिर्वाचित आमदारांची बैठक झाली. या बैठकीत सम्राट चौधरी यांची पक्षाच्या विधिमंडळ नेतेपदी तर विजय सिन्हा यांची उपनेतेपदी निवड करण्यात आली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी निवडणुकीच्या प्रचारादरम्यान चौधरी यांच्या मतदारसंघातील मतदारांना त्यांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन केले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना मोठी संधी देतील, असे आश्वासन दिले होते.

मोदी-शहांनी आपले म्हणणे खरे करून दाखवत सम्राट चौधरी यांच्या खांद्यावर पुन्हा मोठी जबाबदारी टाकली आहे. नितीश कुमार यांच्या मंत्रिमंडळात चौधरी आणि सिन्हा हे दोघे उपमुख्यमंत्री असतील, यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले. नितीश कुमार यांच्या मागील सरकारमध्येही हे दोघे उपमुख्यमंत्री होते. त्यामुळे पुन्हा एकदा बिहारमध्ये ही तिकडीच राज्य कारभार पाहणार आहे.

PM Modi, Nitish Kumar
Angar Election update : उज्ज्वला थिटेंचा मुलगाच होता सूचक, टॅक्टिक वापरून सही केली गायब; अजितदादांच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

बिहारमध्ये चौधरी आणि सिन्हा हे दोघे मातब्बर नेते मानले जातात. निवडणुकीआधी तर चौधरी यांच्याकडे मुख्यमंत्रिपदाचे भाजपमधील प्रमुख दावेदार म्हणून पाहिले जात होते. पण नितीश कुमारांनी आपली ताकद दाखवून दिल्याने भाजपला पुन्हा एकदा चौधरी आणि सिन्हा या तगड्या नेत्यांना उपमुख्यमंत्री करावे लागले आहे. नितीश कुमार यांच्यासमोर या दोन्ही नेत्यांना भाजपचा वचक ठेवण्याची महत्वपूर्ण जबाबदारी असणार आहे.

PM Modi, Nitish Kumar
Local Body Elections : सुप्रीम कोर्टातील आरक्षणावरील सुनावणीआधी वकिलांचं मोठं विधान; हजारो उमेदवारांचे भवितव्य धोक्यात...

दरम्यान, चिराग पासवान यांनी राज्यात चांगले यश मिळविल्याने मंत्रिंमडळात त्यांना भाजप, जेडीयू पाठोपाठ मोठे स्थान मिळण्याची शक्यता आहे. पासवान यांच्या पक्षाला उपमुख्यमंत्रिपदही दिले जाऊ शकते, अशी चर्चा होती. पण ती चर्चा आता फोल ठरली आहे. त्यांच्या पक्षाला मंत्रिमंडळात काही महत्वाची खाती मिळू शकतात. त्याचप्रमाणे उपेंद्र कुशवाह आणि जीतनराम मांझी यांच्या आमदारांचाही मंत्रिमंडळात मान राखावा लागणार आहे. उद्या नितीश कुमार यांच्यासह किमान 20 आमदार मंत्रिपदाची शपथ घेण्याची शक्यता आहे.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com