Amar Kale BJP criticism Sarkarnama
विदर्भ

Amar Kale BJP criticism : शिंदेंच्या दोन्ही 'संजय' कृत्यावर पवारांचा शिलेदार भडकला; म्हणाला, 'करतेय महायुती सरकार, लाज वाटतेय..!'

NCP MP Amar Kale Slams BJP Mahayuti Over Sanjay Shirsat and Sanjay Gaikwad Controversy : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार अमर काळे यांनी शिवसेना मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या कृत्यावरून भाजप महायुतीवर टीका केली.

Pradeep Pendhare

Sanjay Shirsat Sanjay Gaikwad case : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे वर्धामधील खासदार अमर काळे यांनी भाजप महायुती सरकारवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट आणि आमदार संजय गायकवाड यांच्या कृत्यावरून जोरदार निशाणा साधला आहे.

"राज्यातील भाजप महायुती सरकार अतिशय असंवेदनशील, असं सरकार आहे. संजय शिरसाट अन् संजय गायकवाड यांनी केलेल्या कृत्य पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही लाज वाटते", असा घणाघात खासदार अमर काळे यांनी केला.

खासदार अमर काळे म्हणाले, "राज्यातील भाजप (BJP) महायुती सरकार अतिशय असंवेदनशील, असं सरकार आहे. संजय गायकवाड यांनी कँटीन कर्मचाऱ्याला केलेली मारहाण पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हालाही लाज वाटते". दुसरीकडे राज्याचे मंत्री संजय सिरसाट यांच्या घरातील व्हिडीओ जो व्हायरल झाला, त्या बॅगेत नोटांचे बंडल दिसत आहे. एवढ्या नोटा त्यांच्याकडे आल्या कुठून? कोणाच्या होत्या? याचा तपास करण्यात यावा, अशी मागणीही अमर काळे यांनी केली.

"मंत्री संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या घरातील व्हायरल झालेल्या बॅगेच्या व्हिडिओतील संपत्तीवरून बोलताना, खासदार काळे म्हणाले, एखाद्या सामान्य थोडीफार अधिकची संपत्ती सापडल्यास त्याच्यावर कारवाई केली जाते. मग हाच न्याय मंत्र्याला का नाही? संजय शिरसाट यांच्या घरामधील रूममध्ये बसलेले आहेत आणि तिथं बॅग बाजूला आहे. त्या बॅगमध्ये पैसे स्पष्ट दिसत आहे. इतका पैसा त्यांच्याकडे आला कसा? कोणाचा आहे? कुठून आला? याची सरकारने दखल घेत तपास केला पाहिजे", अशी मागणी अमर काळे यांनी केली.

शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी मुंबईतील आमदार आकाशवाणी निवासस्थानातील कँटीनमध्ये केलेल्या मुक्केबाजीवरून खासदार अमर काळे यांनी राज्य सरकार अतिशय असंवेदनशील असल्याचे म्हटले. "ज्यापद्धतीने संजय गायकवाड यांनी कँटीनमध्ये जातं कर्मचाऱ्याला मारहाण केली. वास्तविक पाहता लोकप्रतिनिधी म्हणून आम्हाला सुद्धा त्या गोष्टीचा लाज वाटते. अशा कृतीमुळे लोकप्रतिनिधीकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टिकोन सुद्धा या निमित्ताने वाईट होतो".

'कृती एकाची असते. पण त्याचे परिणाम सर्वांना भोगावे लागतात. आम्ही लोकांमध्ये वावरतो. संजय गायकवाड यांच्या या कृत्यामुळे आमच्याकडे देखील पाहण्याचा दृष्टीकोन बदलला आहे. संजय गायकवाड यांनी केलेल्या जबर मारहाणीचा फक्त अदखलपात्र गुन्हा दाखल होत असेल, सरकार किती असंवेदनशील आहे, याचा प्रत्यय येतो. गृहखातं मुख्यमंत्र्याकडे आहे, त्यांनी याची गंभीर दखल घेतली पाहिजे. संजय गायकवाड यांच्यावर थेट गुन्हा दाखल व्हावा', अशी मागणी अमर काळे यांनी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT