Mumbai News : राज्याच्या राजकारणात जून 2022 साली मोठी उलथापालथ झाली. यावेळी शिवसेना पक्षात उभी फूट पडली होती. एकनाथ शिंदे यांनी समर्थक आमदारांना सोबत घेऊन बंड केले होते. यावेळी शिंदे 40 आमदार घेऊन गुवाहाटीला गेले होते. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार कोसळले होते. त्यावेळी 2022 मध्ये जे ऑपरेशन शिंदे झाले त्यामध्ये भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा रोल महत्त्वाचा होता.
त्यावेळी पक्षाने व देवेंद्र फडणवीसांनी ( Devendra Fadnavis) रवींद्र चव्हाण यांच्यावर मोठी जबाबदारी दिली होती. त्यावेळी त्यांना दिलेली सर्व जबाबादारी प्रामाणिकपणे पार पाडली. ते सर्व यशस्वी होण्याकरता जे-जे प्रयत्न करावे लागले ते त्यांनी प्रामाणिकपणे केले होते. त्यामुळेच त्यावेळी देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील असे वाटत होते. मात्र, एअरपोर्टवरून राज्यपालांकडे आम्ही गेलो. त्याठिकाणी गेल्यावर मला समजले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत. हे कोणालाही माहिती नव्हते, कदाचित फडणवीसांना हे माहित असेल. मला हे माहिती झालं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मला अतिशय दु:ख वाटले, धक्का बसला, डोळ्यात पाणी आले अन् त्यानंतर चालत चालत नाक्यापर्यंत गेलो. असा 2022 सालचा किस्सा रवींद्र चव्हाणांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखती प्रसंगी सांगितला.
भाजप (BJP) नेते आणि नुकतेच भाजपच्या प्रदेशाध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दिलेल्या मुलखतीमध्ये रवींद्र चव्हाण यांनी त्या सर्व घडामोडींबद्दल सांगितले. 2022 मध्ये जे ऑपरेशन शिंदे झाले त्यामध्ये या सर्व विषयांमध्ये विशेष लक्ष घालून काम करावं त्यावेळी पक्षाला वाटलं देवेंद्र फडणवीसांना वाटलं. त्यावेळी त्यांनी मला जबाबादारी दिली होती. ते सर्व यशस्वी होण्याकरता जे जे प्रयत्न करावे लागले ते मी प्रामाणिकपणे केले, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आणि माझे गेली अनेक वर्षे अतिशय चांगले मैत्रीपूर्ण संबंध होते. त्यामुळे सहजपणे करता येऊ शकतं सगळं त्यामुळे ती जबाबदारी माझ्यावरती सोपवली. त्या काळात जे आवश्यक आहे ते मी केलं. भेटीगाठी करणं, बैठका, दोघे एकत्र भेटू शकत नव्हते, तेव्हा देवेंद्र फडणवीस विरोधी पक्षनेते होते. त्यामुळे माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता कोणाला भेटला काय किंवा नाही काय याकडे दुर्लक्ष होत होते. यावेळी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात एक धोरण आखण्यात आले होते, त्यातला एक पार्ट किंवा गोष्टी घडवून आणण्यासाठी एक निमित्त लागते, ते निमित्त म्हणून मी होतो, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
अन् डोळ्यात पाणी आले
भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत होते. त्याप्रमाणे मला देखील तेच वाटले होते, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील. मी गोव्यावरून इकडे आलो होतो. त्यामुळे माझ्याकडे माझी गाडी नव्हती. त्यामुळे ज्या गाडीतुन आम्ही एअरपोर्टवरून त्या ठिकाणी गेलो होतो, तिथे राज्यपालांच्या येथे गेल्यावर मला समजले की, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार नाहीत. हे कोणालाही माहिती नव्हतं, कदाचित फडणवीसांना हे माहित असेल. मला हे माहिती झालं तेव्हा एक कार्यकर्ता म्हणून मला अतिशय दु:ख वाटलं, त्यावेळी मी तिथून बाहेर पडलो, अतिशय मोठा पाऊस पडत होता. मी अस्वस्थ झालो, डोळ्यात पाणी होतं, त्यानंतर चालत चालत नाक्यापर्यंत गेलो. तिथे टॅक्सी पकडली, ट्रेनमध्ये बसलो आणि घरी गेलो, असा किस्सा रवींद्र चव्हाण यांनी सांगितला.
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत पण तसे झाले नाही, आमचा अपेक्षाभंग झाला, त्यावेळी एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले, फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, मला वाईट वाटलं त्यामुळं मी चालत कुर्ल्याला गेलो, मला घरातून फोन आला फडणवीस उपमुख्यमंत्री झाले, मी कुठे आहे ते विचारले मी सांगितले घरी येतोय, त्यानंतर परत फडणवीसांचा फोन आला, नंतर मी एकनाथ शिंदेंसोबत गोव्याला गेलो, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.