Buldhana connection of terrorists
Buldhana connection of terrorists file photo
विदर्भ

NIAच्या तपासात दहशतवाद्यांच बुलढाणा कनेक्शन उघड ; हेरगिरीचा संशय

सरकारनमा ब्युरो

बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील १२०० लोकसंख्या असलेल्या या सोनेवाडी गावात शुक्रवारी रात्री दीड वाजण्याच्या सुमारास स्थानिक दोन पोलिसांच्या मदतीने गावातील दोन जणांच्या घरावर एकाच वेळी छापे टाकून घराची झडती घेण्यात आली. या घटनेने संपूर्ण जिल्हा ही हादरला आहे. NIAने दहशतवादी हल्ल्याचा संबंध जोडत छापमारी केली आहे.

सोनेगाव येथील छाप्यात राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA)काय मिळाले हे जरी सविस्तर माहिती नसलं तरी सोनेगाव येथून गोपाळ गोफने या व्यक्तीची चौकशी करण्यात आली असून काही संशयास्पद सिम कार्ड व काही कागदपत्रे NIAने हस्तगत केलं असल्याची माहिती मिळाली आहे , पण ज्या व्यक्तीला ताब्यात घेतलं त्याबद्दल अजूनही अधिकृत माहिती मिळालेली नाही.

हेरगिरीच्या संशयावरून राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) बुलढाणा व गुजरात मधील गोधरा येथे छापे टाकले आहेत. जानेवारी 2020 मध्ये आंध्रप्रदेशात दाखल झालेल्या गुन्ह्यासंदर्भात हे छापे असल्याचं NIA ने म्हटलं जात आहे. दहशतवादी हल्ले करण्यासाठी संवेदनशील माहिती गोळा करण्यासाठी ही कारवाई करण्यात आली आहे.

भारतात दहशतवादी हल्ले घडवून आणण्यासाठी पाकिस्तानी गुप्तहेरानी विशाखापट्टणम व मुबंई आणि गोव्यातील आरोपींसोबत कट रचल्याच आतापर्यंत तपासात उघड झाले आहे. बेकायदेशीर भारतीय सिमकार्ड मिळवून त्याचा उपयोग झाल्याच ही उघड झालं आहे. भारतीय सिमकार्ड वापरून व्हाट्सएपच्या माध्यमातून माहिती पुरविल्या च कनेक्शन बुलढाणा येथील छाप्या संबंधी आहे. त्यामुळे पाकिस्तानी हेरांची या कृत्यात सहभाग असल्याचा संशय NIA ला आहे. गुजरात मधील गोधरा व बुलढाणा येथे एकाच वेळी छापे मारण्यात आले असून यात काही संशयास्पद सिम कार्ड , संशयास्पद कागदपत्रे व काही इलेक्ट्रॉनिक साहित्य जप्त केले असून पुढील कारवाई होत आहे.

गोपाळ गोफने नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता काही सिम कार्ड व काही कागदपत्रे आढळून आली. NIAची टीम ही सर्व माहिती घेऊन हैद्राबादच्या दिशेने गेली आहे. NIAच्या आतापर्यंतच्या तपासात जर दहशतवाद्यांच बुलढाणा कनेक्शन उघड झाले तर जिल्ह्यातील प्रशासनासमोर मोठं आव्हान असणार आहे आणि या पुढे जिल्ह्यातील इंटेलिजन्स मोठ्या ताकदीने कामाला लावावे लागणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT