Radhakrushn Vikhe, Amol Kolhe, Nitin Deshmukh  Sarakarnama
विदर्भ

Nitin Deshmukh News : मिटकरीनंतर नितीन देशमुखांचा विखे पाटलांवर गंभीर आरोप

Sachin Waghmare

Akola News : राज्य सरकरमधील चार मंत्र्यांच्या कारभारावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सडकून टीका केली होती. राज्य सरकारमधील भाजपचे चार मंत्र्यांवर टीका करीत राज्यातील महायुतीला घरचा आहेर दिला. राज्याचे महसूल मंत्री आणि अकोल्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे वेळ देत नसल्याची प्रतिक्रिया मिटकरी यांनी केली होती. अमोल कोल्हे यांनी केलेल्या टीकेनंतर राज्यातील विरोधी पक्ष चांगलाच आक्रमक झाला असून त्यांनी या मंत्र्यांना घेरण्यास सुरुवात केली आहे.

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख (Nitin Deshmukh) यांनी अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. देशमुख यांनी विखे पाटील यांच्यावर 'ऑनलाइन पालकमंत्री' असल्याचा टोला यांनी लगावला आहे. अकोल्यात आमदार मिटकरी यांच्या प्रतिक्रियेनंतर शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी नागरिकांसह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनाच्या पायऱ्यांवर ठिय्या आंदोलन केले आहे. (Nitin Deshmukh News)

जिल्हा नियोजन समितीच्या बैठक बुधवारी अकोला येथे आयोजित करण्यात अली होती. या बैठकीस पालकमंत्री विखे पाटील (Radhakrushna Vikhe Patil) ऑनलाइन उपस्थित राहणार असल्याचे समजताच शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमा झाले होते. त्यानंतर आमदार नितीन देशमुख यांनी विखे पाटलांवर टीका केली.

यावेळी ठाकरे गटाने आक्रमक होत पालकमंत्री विखे पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. विखे पाटलांना आता कोरोना काळ सुरू झाला असेल म्हणूनच ऑनलाईन बैठका घेत असल्याचा टोला आमदार नितीन देशमुख यांनी लगावला. विखे पाटील हे ऑनलाईन पालकमंत्री असल्याची टीका यावेळी करण्यात आली.

महायुती सरकरमधील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी चर मंत्र्यांच्या कार्यपध्दतीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर यावरून कोंडीत पकडण्याची संधी उपलब्ध होताच काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली.

पालकमंत्री असणारे राधाकृष्ण विखे पाटील अकोल्याला वेळ देत नाही अशी प्रतिक्रिया आमदार अमोल मिटकरी यांनी दिली होती. दरम्यान अकोल्यात आज होणाऱ्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत विखे पाटील ऑनलाइनच उपस्थित राहणार असल्याचे कळताच ठाकरे गटाने पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधत ठिय्या आंदोलन केलंय.

गेल्या सहा महिन्यांत अकोला जिल्ह्यातील वेगवेगळ्या घटना पाहता, राधाकृष्ण विखे पाटील स्वतः अजिबात उपस्थित राहिले नाहीत. मागची जिल्हानियोजन बैठक होती, त्यावेळीही ते व्हिसीद्वारे उपस्थित होते. गेल्या आठ दिवसांपासून अकोल्यातील शेतकऱ्यांसंदर्भातील विषय फार महत्त्वाचे असताना व जिल्ह्यात पूरपरिस्थिती पाहता, सोयाबिन, कापसासंदर्भात पालकमंत्र्यांना वारंवार फोन करतोय, त्यांच्या ओएसडींना फोन केला, पण काहीच उपयोग झाला नाही अशी टीका यावेळी अमोल मिटकरींनी केली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT