Nitin Gadkari. Sarkarnama
विदर्भ

BJP Politics : 'जेवढ्या वेगाने वर गेलो तेवढ्याच वेगाने खाली आपटू, भाजपमधील इन्कमिंगवर गडकरींची नाराजी'; बावनकुळे म्हणाले, आम्हाला...

Nitin Gadkari Advice to BJP Leaders : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना 'घर की मुर्गी दाल बराबर' समजू नका, त्यांचा मानसन्मान राखा अन्यथा जेवढ्या वेगाने वर गेलो तेवढ्याच वेगाने खाली आपटाल असा सल्ला देऊन भाजपच्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केली आहे.

Rajesh Charpe

Nagpur News, 25 Oct : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रामाणिक निष्ठावंत कार्यकर्त्यांना 'घर की मुर्गी दाल बराबर' समजू नका, त्यांचा मानसन्मान राखा अन्यथा जेवढ्या वेगाने वर गेलो तेवढ्याच वेगाने खाली आपटाल असा सल्ला देऊन भाजपच्या इनकमिंगवर नाराजी व्यक्त केली आहे.

यावरून भाजपमध्ये चांगलीच खळबळ उडाली आहे. अनेकांनी गडकरी यांच्या वक्तव्याचे जोरदार समर्थन केले आहे. बाहेरच्यांना डोक्यावर बसवू नका अशी मागणी केली जात आहे. यावर भाजपचे नेते आणि राज्याचे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, हे खरे आहे आणि नितीन गडकरी यांची सूचना आम्हाला मान्य आहे.

भाजप आणि शिवसेनेने सत्ता स्थापन केली होती. युतीकडे बहुमत असताना अजित पवार यांनाही सोबत घेतले. त्यावेळी मोठी नाराजी व्यक्त करण्यात आली होती. विधानसभेची निवडणुका महायुतीने सोबत लढली. पुन्हा तीन पक्षांचे सरकार स्थापन झाले आहे. बाहेरच्यांना मोठमोठी पदे दिली जात असल्याने भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत सावनेर विधानसभा मतदारसंघात भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार प्रमुख दावेदार होते. मात्र त्यांना डावलण्यात आले. भाजप, काँगेस परत भाजप असा प्रवास करणारे आशिष देशमुख यांना उमेदवारी दिली. हाच धागा पकडून शुक्रवारी नितीन गडकरी यांनी सावनेर विधानसभा मतदारसंघातील कमळमेश्वर येथे झालेल्या रस्त्याच्या भूमिपूजनाच्या कार्यक्रमात बाहेरच्यांना डोक्यावर घेताना निष्ठावंतावर अन्याय करू नका असा सल्ला भाजपच्या नेत्यांना दिला होता.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. त्यांनाच उद्देशून गडकरी यांनी निष्ठावंत व प्रामाणिक कार्यकर्त्यांना जपा, त्यांच्यावर अन्याय होऊ देऊ नका असा सल्ला दिला होता. अनेक विषय पेंडिग आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बावनकुळे हे पोतदार यांच्यावर झालेला अन्याय दूर करतील अशी आशाही व्यक्त केली. त्यांच्या वक्तव्याचे राजकीय पडसाद उमटले आहेत.

भाजप कार्यकर्त्यांची व्यथा, अस्वस्थता, नाराजी गडकरी यांनी मांडली असून याची दखल घेण्याची मागणी केली जात आहे. विशेष म्हणजे आशिष देशमुख हे भाजपचे आमदार होते. त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरच तोफ डागली होती. मध्येच पक्ष सोडला. त्यानंतर ते काँग्रेसमध्ये दाखल झाले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधातही निवडणूक लढले. पराभव झाल्यानंतर पुन्हा भाजपमध्ये दाखल झाले. त्यांना लगेच उमेदवारीसुद्धा देण्यात आल्याने भाजपमध्ये अद्यापही नाराजी कायम आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT