Pune Politics : पुण्यात अजितदादांनीही फिल्डिंग लावली, भाजपला रोखण्यासाठी आमदारांना लावलं कामाला

Ajit Pawar Pune Politics : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस गड राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गड असलेल्या या भागामध्ये भाजपने गेल्या काही दिवसांपासून आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते आपल्याकडे घेऊन भाजपने अजित पवार यांना खिंडीत गाठण्याची रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.
Ajit Pawar Power in Maharashtra
Ajit Pawar Power in MaharashtraSarkarnama
Published on
Updated on

Pune News, 25 Oct : पुणे जिल्हा हा राष्ट्रवादी काँग्रेस गड राहिला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा गड असलेल्या या भागामध्ये भाजपने गेल्या काही दिवसांपासून आपली ताकद वाढवण्यास सुरुवात केली आहे. महाविकास आघाडीतील अनेक नेते आपल्याकडे घेऊन भाजपने अजित पवार यांना खिंडीत गाठण्याची रणनीती आखल्याचं बोललं जात आहे.

अशातच अजित पवारांनी आपला हा गड राखण्यासाठीची कंबर कसल्याचं पाहायला मिळत आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका जिंकण्याच्या दृष्टिकोनातून अजित पवार यांनी आपल्या पक्षाच्या आमदारांना कामाला लावला आहे. आपल्या भागातील परिस्थितीचा आढावा घेऊन निवडणुकीसाठी शिलेदारांना तयारीत ठेवण्याची जबाबदारी आमदारांना देण्यात आली आहे.

त्या दृष्टिकोनातून आता इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात सुरुवात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या. पुणे जिल्ह्यात आमदार शंकर मांडेकर यांच्या उपस्थितीत या मुलाखती पार पडल्या. सहा गणांसाठी एकूण 33 इच्छुकांनी, तर तीन गटांसाठी 12 इच्छुकांनी मुलाखती दिल्या.

Ajit Pawar Power in Maharashtra
Karad Politics : अजितदादांच्या राष्ट्रवादीने रिप्लाय दिला नाही..., अख्खा पक्षच भाजपच्या गळाला, प्रवेशाचा मुहूर्तही ठरला

मुळशी तालुक्यातील घोटावडेफाटा येथील सुंदरबन मंगल कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे संवाद मेळावा आणि इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उमेदवारांनी समर्थकांसह शक्तिप्रदर्शन केले. मुळशी तालुक्यात राष्ट्रवादीने निवडणूक तयारीत आघाडी घेतल्याचे दिसून आले.

Ajit Pawar Power in Maharashtra
Satara Politics : शशिकांत शिंदेंना एका मताने पाडणारा नेता आता पत्नीसाठी मैदानात : राष्ट्रवादीला पुन्हा धडकी

मुळशी तालुक्यात जिल्हा परिषदेचे 3 गट आणि पंचायत समितीचे 6 गण आहेत. आरक्षण सोडत जाहीर होण्यापूर्वीच अनेकांनी निवडणुकीच्या तयारीला सुरुवात केली होती. या मेळाव्यात पौड गणातून 4, अंबडवेट गणातून 9, माण आणि हिंजवडी गणातून प्रत्येकी 4, पिरंगुट गणातून 7, आणि भुगाव गणातून 5 उमेदवारांनी मुलाखती दिल्या.

तसेच, पौड-अंबडवेट गटातून 3, माण-हिंजवडी गटातून 4, आणि पिरंगुट-भुगाव गटातून 5 इच्छुकांनी मुलाखती दिल्या, अशी माहिती मुळशी तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अंकुश मोरे यांनी दिली. यावेळी पक्षाचे विविध सेलचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .आता टप्याटप्याने सर्व राज्यात अश्या पध्दतीने मुलाखती घेण्यात येणार आहे. या माध्यमातून राष्ट्रवादी काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढण्याची करत असल्याचे देखील बोले जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com