Nitin Gadkari, Devendra Fadnavis Sarkarnama
विदर्भ

Nagpur Politics: गडकरी-फडणवीसांचं भूमिपूजन अन् लोकार्पणाचे अचूक टायमिंग, नागपूरमध्ये चर्चांना उधाण

Mahapalika Election Code Of Conduct: लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचे मताधिक्य घटले होते. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपने शहरातील सहापैकी 4 विधानसभा मतदारसंघ जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे.

Rajesh Charpe

Nagpur News : मागील पंधरा दिवसांपासून 15 डिसेंबरच्या आसापास महापालिका निवडणुकीची घोषणा होईल आणि आचारसंहगिता लागू होईल असा अंदाज वर्तविला जात होतो. तो तंतोतंत खरा ठरला आहे. हिवाळी अधिवेशन आटोपातच निवडणूक आयोगाने सोमवारी महापालिका निवडणुकीची घोषणा केली. त्यापूर्वी सकाळी केंद्रीयमंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर शहरातील कोट्यवधी रुपयांच्या प्रकल्पांचे भूमिपजून आणि लोकार्पण केले. त्यावरून भाजपच्या नेत्यांना आचारसंहिता लागणार आहे याची आधीच माहिती होती का? अशी चर्चा रंगली आहे.

मुख्यमंत्री आणि गडकरी यांनी आचारसंहिता लागण्यापूर्वी भूमिपूजन आणि लोकार्पणाचे अचूक टायमिंग साधले. दोन्ही नेत्यांनी नागपूर शहरातील जवळपास 1500 कोटी रुपयांचे भूमिपजून व लोकार्पण केले. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबईकडे रवाना झाले. नागपूरसह राज्यातील महापालिका निवडणुका गेल्या पावणेचार वर्षांपासून विविध कारणांमुळे लांबल्या आहेत.

ओबीसी आरक्षण (OBC Reservation), प्रभागरचना आणि निवडणूक पद्धतीवरील वादामुळे या निवडणुकांचा मार्ग रखडला होता. मात्र, 31 जानेवारी 2026 पूर्वी सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे निर्देश न्यायालयाने दिल्यानंतर हालचालींना वेग आला आहे. नगरपंचायत व नगरपरिषदांच्या निवडणुका टप्प्याटप्प्याने सुरू असून, दुसऱ्या टप्प्यात 20 डिसेंबरला मतदान आणि 21 डिसेंबरला मतमोजणी होणार आहे.

दरम्यान, नागपूर मनपासाठी प्रभागरचना पूर्ण झाली असून, प्रारूप मतदार यादीवरील हरकती निकाली काढून सोमवारी (ता. 15) अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होत आहे. प्रभागनिहाय आरक्षणात 50 टक्क्यांहून अधिक मर्यादा ओलांडल्याचा मुद्दा असला, तरी त्याबाबत राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप स्पष्ट निर्देश मिळालेले नाहीत.

अशा पार्श्वभूमीवर, अधिवेशन संपताच आचारसंहिता लागू होण्याची शक्यता लक्षात घेऊन शहरात विकासकामांचे लोकार्पण व भूमिपूजन झपाट्याने उरकले जात आहेत. शनिवारी मध्य नागपुरातील वंदे मातरम उद्यानासह नागरिकांना मालकी हक्काच्या पट्ट्यांचे वाटप करण्यात आलेत.

तर रविवारी टिमकी येथील समाजभवनाचे भूमिपूजन पार पडले असून, सोमवारी (ता. 15) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत मनपा, नागपूर सुधार प्रन्यास, महारेल आदींकडील शहरातील दीड हजार कोटी रुपयांहून अधिक विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण होत आहे. ही सर्व कामे सुमारे चार हजार कोटी रुपयांची असल्याचे सांगण्यात येते.

लोकसभेच्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचे मताधिक्य घटले होते. विधानसभेच्या निवडणुकीत मात्र भाजपने शहरातील सहापैकी 4 विधानसभा मतदारसंघ जिंकून पुन्हा एकदा आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. पंधरा वर्षांपासून महापालिका भाजपच्या ताब्यात आहे. गडकरी आणि फडणवीस यांच्या अस्तित्वासाठी भाजपला महापालिका जिंकणे आवश्यक आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT