Nitin Gadkari on Forest Roads. Sarkarnama
विदर्भ

Bhandara : नवीन कलम असेल तर फॉरेस्ट अधिकाऱ्यांना आत टाका, असे का म्हणाले गडकरी

Nitin Gadkari : ‘हायवेमॅन’ ओळख असलेल्या केंद्रीय मंत्र्यांचे पोलिस अधीक्षकांना आवाहन

अभिजीत घोरमारे

Pauni : ‘हायवेमॅन’ म्हणून प्रसिद्ध असलेले केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आपल्या थेट वक्तव्यांमुळे नेहमी चर्चेत असतात. त्यांच्या एका वक्तव्यामुळे ते पुन्हा चर्चेत आले आहेत. ‘नवीन कुठले कलम असल्यास ते लावा आणि या रस्त्यांच्या कामांमध्ये आडकाठी घालणाऱ्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका’, असे थेट विधान गडकरी यांनी जाहीर सभेत केले आहे.

भंडारा पोलिस अधीक्षकांना उद्देशून त्यांनी हे विधान केले आहे. पवनी येथील ग्रामीण विकास संस्थेच्यावतीने आनंद विद्यालयाच्या कोनशिला कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी त्यांनी वन अधिकाऱ्यांविषयी उद्विग्न प्रतिक्रिया व्यक्त केली.

भंडारा ते पवनी या रस्त्यासाठी निधी मंजूर होऊन अनेक वर्षे झालीत. निधी मंजूर झालेला असतानाही केवळ वनविभागाच्या जाचक अटींमुळे गेल्या 12 वर्षांपासून रस्ता झालेला नाही. या कारणामुळे वना अधिकाऱ्यांसोबत अनेकदा बैठक घेतल्या. मात्र वन विभागाचे नियम रस्ता पूर्ण करण्यास आडकाठी करीत आहेत. त्यामुळे काम अपूर्ण आहे. भंडारा ते पवनी या रस्त्याचे बांधकाम अनेक प्रयत्नांनंतरही थांबलेल्याने गडकरी यांनी जाहीर भाषणतून भंडाऱ्याचे जिल्हाधिकारी आणि पोलिस अधीक्षकांना भाषणादरम्यान विनंती करून आपण वैतागलो आहोत, अशी उद्विग्न प्रतिक्रिया दिली.

पोलिस अधीक्षकांना उद्देशून ते म्हणाले की, ‘नवीन कुठले कलम असल्यास ते लावा आणि या रस्त्यामध्ये आडकाठी घालणाऱ्या नतद्रष्ट फॉरेस्ट अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करून त्यांना आत टाका.’ या वक्तव्यातून गडकरी यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांवर नाराजी व्यक्त केली. सरकारच्या कोणल्याही कामात हस्तक्षेप करायचा नाही. मदतही घ्यायची नाही. आपण नेहमी गमतीने म्हणतो की, सरकार विषकन्येसारखे आहे. जिथे सरकारची मदत मिळते तिथे तो प्रयोग बंद पडतो. त्यामुळे आपण कुठल्याही सरकारची मदत घेत नाही. सरकारच्या अधिकाऱ्यांकडे जात नाही. अधिकाऱ्यांना गळ घालता घालता डोक्यावरचे केस उडून जातात, असे गडकरी म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सहकार्य प्रशासनातील अधिकाऱ्यांचे घ्या. प्रशासनातील अधिकाच्यांकडून योग्य सहकार्य घ्या. प्रगतीचे उपक्रम राबविणाऱ्यांना जनतेने प्रामाणिकपणे सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले. गरिबी, दुर्बल घटकांची वणवण दूर होण्यासाठी त्यांच्या पाल्यांनी उच्च शिक्षण घेतले पाहिजे. यासाठी ग्रामविकास शिक्षण संस्थेने निर्माण केलेले आनंदम विद्यालय जगात नावारूपाला यावे. शिक्षणानेच माणसाचे व्यक्तिमत्त्व घडते, असे प्रतिपादन नितीन गडकरी यांनी केले. पवनी तालुक्यातील सिरसाळा येथे आनंदम विद्यालय इमारतीच्या कोनशिला अनावरण त्यांच्या हस्ते करण्यात आले.

Edited by : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT