Vidharbh BJP MLA News : भाजपला महाराष्ट्रात दणदणीत यश मिळवूण देणारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह विदर्भातून निवडून आलेल्या सर्व 36 आमदारांचा भाजपच्यावतीने केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी सत्कार करणार आहेत. यात महसूलमंत्री तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आदिवासी व विकासमंत्री अशोक उइके, राज्यमंत्री पंकज भोयर यांचाही समावेश राहणार आहे.
मंत्रिपदाची अपेक्षा, काहींना मंत्रिमंडळातून मिळलेला डच्चू, खाते वाटपावरून नाराजी या सर्व पार्श्वभूमीवर हा सत्कार सोहळा होऊ घातला आहे. या सत्काराच्या माध्यमातून भाजपमध्ये(BJP) कोणीही नाराज नाही आणि गटबाजीही नाही असा संदेश भाजपच्यावतीने दिले जाणार आहे.
माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी(Atal Bihari Vajpayee) यांच्या जन्मशताब्दी वर्षाला उद्या (ता.२५) बुधवारपासून सुरुवात होत आहे. हेच निमित्त साधून क्रीडा चौकातील ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी पाच वाजता हा सत्कार समारंभ आयोजित केला आहे. तत्पूर्वी अटलबिहारी वाजपेयी यांना अभिवादन करण्यासाठी त्यांच्या कवितांवर आधारित नृत्याचे आयोजनही यावेळी करण्यात आले असल्याची माहिती भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष संजय भेंडे, शहर अध्यक्ष बंटी कुकडे यांनी दिली.
लोकसभेच्या निवडणुकीत भाजपला अपेक्षित यश साध्य करता आले नव्हते. त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत तब्बल 132 आमदार निवडून आले आहे. देवेंद्र फडणवीस(Devendra Fadnavis) यांच्या नेतृत्वात पुन्हा महायुतीची सत्ता राज्यात स्थापन झाली आहे. विधानसभेचा निवडणूक निकाल, त्यानंतर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी निवड, शपथविधी सोहळा, मंत्र्यांचा शपथविधी, खातेवाटप तसेच हिवाळी अधिवेशनात बराच वेळ निघून गेला. आता सर्व स्थिरस्थावर झाले आहे. निवडून आलेल्या आमदारांचा सत्काराच्या माध्यमातून कार्यकर्त्यांचाही उत्साह यानिमित्ताने वाढवला जाणार असल्याचे संजय भेंडे यांनी सांगितले.
भाजपमध्ये(BJP) अनेकवेळा निवडून आलेले आमदार आहेत. त्यांची क्षमताही आहे आणि अनुभवसुद्धा आहे. मात्र मंत्रिमंडळाच्या विस्ताराची मर्यादा आहे. त्यामुळे सर्वांचाच मंत्रिमंडळात समावेश होऊ शकत नाही. यावरून कार्यकर्ते नाराज आहेत. मात्र नेत्यांमध्ये कुठलीही नाराजी नाही. सर्व नाराज असलेले कार्यकर्ते मुख्यमंत्री तसेच आमदारांच्या सत्कार सोहळ्याला उपस्थित राहणार असल्याचे संजय भेंडे यांनी सांगितले. यावेळी नागपूरचे भाजप जिल्हाध्यक्ष सुधाकर कोहळे, आनंद राऊत, चंदन गोस्वामी, अश्विनी जिचकार, बाल्या बोरकर, रामभाऊ अंबुलकर आदी उपस्थित होते.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.