Bachchu Kadu : बच्चू कडू पुन्हा ‘ॲक्शन मोड'वर; सरकारला 'या' मुद्यावर दिला इशारा

Former minister Bachchu Kadu farmers loan waiver herdsmen march Mahayuti government : माजी मंत्री बच्चू कडू यांनी शेतकरी कर्जमाफी आणि मेंढपाळ लोकांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे.
Bachchu Kadu 1
Bachchu Kadu 1Sarkarnama
Published on
Updated on

Nagpur News : अचलपूर विधानसभा मतदारसंघातून सहा वेळा निवडून आलेले माजी मंत्री बच्चू कडू पुन्हा ‘ॲक्शन मोड'वर आले आहेत.

त्यांनी सात जानेवारीला शेतकरी कर्जमाफी आणि मेंढपाळ लोकांसाठी आंदोलनाचा इशारा दिला आहे. यावेळी त्यांनी बच्चू कडू हा पराभवाने खचून जाणारा नाही आणि हिंमतीनेही खचलो नसल्याचे सांगितले.

बच्चू कडू यांचा यंदाच्या विधानसभा निवडणुकीत धक्कादायक पराभव झाला. महाविकास आघाडीच्या कार्यकाळात ते मंत्री होते. महायुतीचे सरकार आल्यानंतर त्यांचे मंत्रिपद गेले. मनाने शिवसेनेसोबत (Shivsena) असतानाही त्यांनी पक्षात प्रवेश केला नाही. नेहमीप्रमाणे अपक्ष लढले. निवडणुकीपूर्वी त्यांनी तिसरी आघाडी उघडली होती. मात्र याचा फटका त्यांना बसला. तिसऱ्या आघाडीचे आणि त्यांच्या प्रहार संघटनेचे सर्वच उमेदवार पराभूत झाले आहेत. त्यामुळे बच्चू कडू आता काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लगले होते.

Bachchu Kadu 1
Yashomati Thakur : 'गरिबाचं पोरगं मेलं, अन् यांना राजकारणाचं पडलं'; CM फडणवीसांवर यशोमती ठाकूर भडकल्या

सरकारविरुद्ध बेडधडक बोलणारा आणि अपंगासाठी अधिकाऱ्यांवर प्रसंगी हात उगारणार आमदार, अशी बच्चू कडू (Bachchu Kadu) यांची ओळख आहे. पराभवाबाबत बोलताना ते म्हणाले, "कदाचित मी आंदोलक म्हणून लोकांना जास्त आवडत असावा म्हणूनच त्यांनी आपल्याला यावेळी पाडले असावे, असे मिश्किलपणे ते म्हणाले. निवडणुकीचा निकाल आपल्यासाठी धक्कादायक आहे. मात्र आपण खचून गेलो नाही. आंदोलक म्हणून आपण आपली भूमिका बजावत राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Bachchu Kadu 1
Top 10 News : मुंबई पुन्हा ताब्यात घेण्यासाठी 'प्लॅनिंग' सुरू; ही' आघाडी बाहेर पडून जाणार महायुतीत - वाचा महत्त्वाच्या घडामोडी

गडकरींची भेट का?

बच्चू कडू यांनी आज केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी माध्यमांसोबत संवाद साधला. आपल्या मोर्शी मतदारसंघाचे महत्त्वाचे विषय होते. त्यासोबतच शकुंतला एक्सप्रेसचे राहिलेले अर्धवट कामे, चांदूरबाजार ते परतवाडा रस्ता यासाठी गडकरी यांची भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.

फडणवीस कर्जमाफीवर बोललेच नाही

भाजप व महायुतीने आपल्या जाहीरनाम्यात शेतकऱ्यांना कर्जमाफीचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली नाही. मात्र जाहिरनाम्यातील जनतेला दिलेली सर्व वचने पाळण्यात येईल, असे आश्वासन दिले आहे. यावरही बच्चू कडू यांनी भाष्य केले. सरकार नेमके कुठले कर्जमाफ करणार आहे. 2012नंतर दोनदा कर्जमाफी झाली. याचा लाभ ज्यांना मिळाला नाही, त्यांना यावेळी काय देणार, असा सवाल त्यांनी सरकारला केला.

कर्जमाफीचा विषय स्पष्ट करा

जानेवारी ते मार्च हे कर्ज वसुलीचे दिवस आहेत. मात्र सरकारच्या घोषणेमुळे कर्ज वसुली थांबली आहे. सगळे कर्ज थकीत राहील आणि पुन्हा नवीन कर्ज शेतकऱ्यांना मिळणार नाही. त्यामुळे सरकारने तातडीने कर्जमाफीचा विषय स्पष्ट करावा, अशी मागणी बच्चू कडू यांनी यावेळी केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com