Buldhana Hospital Fire : केंद्रीय राज्य आरोग्य मंत्र्यांच्या जिल्ह्यातच आरोग्य यंत्रणा व्हेंटिलेटरवर; ग्रामीण रुग्णालयाला आग लागल्याने एकाचा मृत्यू

Union Health Minister District Issues : केंद्रीय आरोग्य मंत्री जाधव यांच्याच जिल्ह्यातील रुग्णालयात इतकी मोठी घटना घडल्याने नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.
Government Hospital
Government HospitalSarkarnama
Published on
Updated on

Buldhana News : राज्यातील आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याचे प्रयत्न यंत्रणेकडून सुरु आहेत. त्यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्नशील आहे. त्यातच केंद्रीय आरोग्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या बुलढाणा जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा गेल्या काही दिवसापासून व्हेंटिलेटरवर असल्याचे दिसत आहे. बुलढाणा जिल्ह्यातच एक धक्कादायक घटना घडली. येथील लोणार ग्रामीण रुग्णालयाला भीषण आग लागली. या दुर्घटनेमध्ये एका रुग्णाचा होरपळून मृत्यू झाला. त्यामुळे या प्रकारानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.

या रुग्णालयात ही आग का आणि कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही. सध्या पोलीस या सर्व प्रकरणाचा तपास करत आहे. मात्र, केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव (Prataprao Jadhav) यांच्याच जिल्ह्यातील रुग्णालयात इतकी मोठी घटना घडल्याने नागरीकातून संताप व्यक्त केला जात आहे.

Government Hospital
Santosh Deshmukh Murder Case : 'संतोषवर वार करणाऱ्यांना फाशीच्या तख्तापर्यंत सरकार नेणार'; मंत्री संजय शिरसाट म्हणाले, 'बीड खतरनाक...'

ही घटना केंद्रीय आरोग्य मंत्री प्रतापराव जाधव यांच्या गावापासून अवघ्या काही किलोमीटरवर असलेल्या लोणार तालुक्यात घडली. 22 डिसेंबरला दुपारी लोणार बसस्थानकावर एक मनोरुग्ण अत्यावस्थेत आढळून आला होता. हरिभाऊ रोकडे अशी या मनोरुग्णाची ओळख पटली होती. अत्यावस्थेत त्यांना तातडीने लोणार येथील जिल्हा रुग्णालयात आणण्यात आले होते.

Government Hospital
Santosh Deshmukh Murder Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडमध्ये शनिवारी निघणार सर्वपक्षीय मोर्चा!

लोणार येथील जिल्हा रुग्णालयातील जनरल वार्डमध्ये 22 डिसेंबरला रात्री आग लागली होती. या आगीत एका रुग्णाचा मृत्यू झाला. हरिभाऊ बाप्पूजी रोकडे असे मृत रुग्णाचे नाव आहे. रोकडे हे पैठण येथील रहिवासी होते. त्यांना उपचारासाठी लोणार ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, रुग्णालयात 22 डिसेंबरला लागलेल्या आगीत होरपळून त्यांचा मृत्यू झाला.

Government Hospital
Devendra Fadnavis, Chhagan Bhujbal : मंत्रिपद नाकारलं, नाराजीचा उद्रेक आता भुजबळांबाबत सीएम फडणवीसांचे मोठे संकेत

रोकडे यांच्याकडे कुटुंबीयांबद्दल चौकशी केली असता त्यांनी आपल्यासोबत कुणीच नसल्याचे सांगितले. रुग्णालयात दाखल झाल्यानंतर त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र, त्यांच्यावर उपचार सुरु असताना रुग्णालयात भीषण आग लागली. या आगीत होरपळल्यामुळे रोकडे यांचा मृत्यू झाला. रुग्णालयात ही आग का आणि कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही या घटनेचा तपास सध्या पोलीस करत आहेत.

Government Hospital
Mahayuti News : मनासारखे घडेना, महायुतीतील 'नाराजीनाट्य' काही संपेना; आता 'या' कारणावरून शिवसेनेचे मंत्री नाराज

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com