Nana Patole, Sharad Pawar, Uddhav Thackeray Sarkarnama
विदर्भ

Congress Politics : काँग्रेसच्या दाव्यामुळे 'या' 2 जिल्ह्यात शिवसेना UBT आणि पवारांच्या राष्ट्रवादीला 'नो एन्ट्री'?

Mahavikas Aghadi News : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. राज्यातील अनेक जागांवर आगाडीतील नेत्यांचं एकमत झाल्याचंही मविआ नेत्यांकडून सांगितलं जातं आहे.

Jagdish Patil

Bhandara News, 06 Oct : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) जागावाटपाच्या चर्चा सुरू आहेत. राज्यातील अनेक जागांवर आगाडीतील नेत्यांचं एकमत झाल्याचंही मविआ नेत्यांकडून सांगितलं जातं आहे.

मात्र, असं असतानाच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंच्या भंडारा जिल्ह्यात मात्र काँग्रेसने 'एकला चलो'ची भूमिका घेतल्याचं पाहायला मिळत आहे. कारण पटोलेंच्या गृह जिल्हा असलेल्या साकोलीत भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यातील काँग्रेसकडून निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या.

भंडारा-गोंदिया (Bhandara-Gondia) जिल्ह्याचे काँग्रेसचे निरीक्षक सतीश चतुर्वेदी यांनी या मुलाखती घेतल्या. लोकसभा निवडणुकीतील घवघीत यशामुळं काँग्रेस (Congress) पक्षाचा कॉन्फिडन्स चांगलाच वाढला आहे. त्याचप्रमाणे आता विधानसभेला जास्तीत जास्त जागा विजयी करण्यासाठी काँग्रेस कामाला लागली आहे.

मात्र, आघाडीतील जागावाटपातही काँग्रेस आपल्या वाट्याला जास्त जागा मागत असल्याची माहिती आहे. अशातच आजच्या मुलाखतीमुळे काँग्रेस आपल्याच म्हणण्यावर ठाम राहणार असल्याचंही बोललं जात आहे. दरम्यान, काँग्रेसचे निरीक्षक सतीश चतुर्वेदी यांनी घेतलेल्या मुलाखतीसाठी साकोलीतून दावेदारी करणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) गैरहजर होते.

तर भंडारा आणि गोंदिया या दोन्ही जिल्ह्यातील सर्व विधानसभेवर याआधी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांनी दावा केला आहे. अशातच आजच्या मुलाखतीमुळे काँग्रेस या दोन्ही जिल्ह्यातील जागा सोडणार नसल्याचं पाहायला मिळत आहे. काँग्रेसनं घेतलेल्या मुलाखतीमुळे काँग्रेस राज्यात स्वतंत्र लढण्याच्या तयारी करत आहे की काय? अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.

काँग्रेस एकही जागा सोडायला तयार नाही

तर, नाना पटोले भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील जागांवर दावा करत आघाडीतील मित्रपक्षांची कोंडी केली आहे. त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेने भंडारा आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तुमसर, भंडारा, अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा या विधानसभेवर दावा केला आहे. मात्र, पटोले एकही जागा सोडायला तयार नसल्यानं इतर दोन मित्र पक्षांचे उमेदवार या जिल्ह्यात दिसणारच नाहीत का? या चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT