Amol Kolhe News : लक्षात ठेवा वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच; अमोल कोल्हेंनी दिला इशारा

Political News : महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. इतकंच नाही तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिले असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.
Amol Kolhe
Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

KolhaPur News : गुलाबी यात्रा पुढं गेली की मागून गळती लागते. गुलाबी जॅकेट घातलं की माणूस बदलत नाही आणि पक्ष चोरला म्हणून माणसं चोरता येत नाही. ईडी आणि सीबीआयला घाबरून अनेकांनी भूमिका बदलल्या. महाराष्ट्र कधी विकला जात नाही, झुकत नाही हे महाराष्ट्राने दाखवून दिलं आहे. इतकंच नाही तर दिल्लीच्या बापासमोर झुकत नाही हे लोकसभेला महाराष्ट्राने दाखवून दिले असल्याचे खासदार अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केले.

चंदगड विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) शरदचंद्र पवार पक्षाच्या शिव-स्वराज्य यात्रेचे रविवारी आगमन झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी अमोल कोल्हे म्हणाले, 'वेढ्यात मराठी वीर दौडले सात हेच याच भूमीत घडलं होतं. स्वामी निष्ठा काय असते हे याच मातीने दाखवले आहे. त्याच मातीत दोघांनी गद्दारी केली. ज्यांनी गद्दारी केली त्यांना स्वाभिमानी जनता जागा दाखवेल.'

बारामतीच्या सेनापतीने सांगितलं की निवडणूक लढवायची की नाही हे कळेना झाले आहे. आता सेनापती असे म्हणत असतील तर इतर काय म्हणत असतील याचा विचार करा. आम्ही 60 ते 62 विधानसभा मतदारसंघात तुतारीचा आवाज येतोय. लक्षात ठेवा आज वेळ तुमची असेल तर येणारा काळ आमचाच आहे, असा इशारा अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांनी दिला आहे.

मंत्री अब्दुल सत्तार यांच्या मतदारसंघात साड्या वाटल्या आहेत. पण स्वाभिमानी बहिणींनी त्या साड्यांचा ढीग केला आणि पेटवून दिला. मुख्यमंत्री म्हणतात 1500 आले आले आले. माझ्या लाडक्या बहिणी म्हणत असतील खिशातून दिले दिले दिले. 100 रुपयांचा स्टॅम्प बंद केला आणि 500 रुपयांचा स्टॅम्प सुरू केला. लाडक्या बहिणीला 1500 देतात, पण दाजीच्या पिकांना हमीभाव द्या, दुधाला दर द्या, अशी मागणी कोल्हे यांनी केली.

Amol Kolhe
Jayant Patil News : जयंत पाटलांचे मोठं विधान; म्हणाले, 'चंदगडमध्ये नवा चेहरा...'

चंदगड विधानसभा मतदारसंघात हत्तीचा त्रास खूप आहे, पण सरकार त्याला काही मदत करत नाही. महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार येणार आहे. त्यामुळे येत्या काळात नागरिकांनी महाविकास आघाडी सरकारच्या उमेदवाराला साथ द्यावी, असे आवाहन त्यांनी केले.

Amol Kolhe
Abdul Sattar News : मंत्री सत्तारांकडून वाटप करण्यात आलेल्या साड्यांची महिलांकडून होळी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com