Vijay Wadettiwar, Chhagan Bhujbal Sarkarnama
विदर्भ

OBC Politics : 'भुजबळांनी असं करायला नको होतं...', महाएल्गार सभेतील वडेट्टीवारांच्या व्हिडिओ प्रकरणावर OBC महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी व्यक्त केली नाराजी

OBC MahaElgar Sabha Beed : बीडमधील महाएल्गार सभेतून मराठा आंदोल मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली. मात्र, त्याचवेळी त्यांनी सतत ओबीसी समाजाची बाजू घेणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. एवढंच नव्हे तर या महाएल्गार सभेत थेट वडेट्टीवार यांचा जुना व्हिडिओ दाखवण्यात आला.

Jagdish Patil

Nagpur News, 18 Oct : काल बीड येथे ओबीसी समाजाच्या वतीने महाएल्गार सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेसाठी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मंत्री छगन भुजबळ, भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासह ओबीसी समाजाचे इतर नेते उपस्थित होते.

मात्र, या सभेसाठी काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांना महाएल्गार सभेचं निमंत्रण दिलं नव्हतं. तर कालच्या सभेतून मराठा आंदोल मनोज जरांगे पाटील यांच्यावर मंत्री छगन भुजबळ यांनी सडकून टीका केली.

मात्र, त्याचवेळी त्यांनी सतत ओबीसी समाजाची बाजू घेणारे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्यावरही निशाणा साधला. एवढंच नव्हे तर या महाएल्गार सभेत थेट वडेट्टीवार यांचा जुना व्हिडिओ दाखवण्यात आला. ज्यामध्ये ते मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलन स्थळी जात मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण दिलं पाहिजे, या मागणीचं समर्थन करताना दिसत आहेत.

मात्र, आता वडेट्टीवारांचा व्हिडिओ दाखवल्याच्या प्रकरणावरून ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबनराव तायवाडे यांनी नाराजी व्यक्त केली आहे. 'मंत्री छगन भुजबळ हे ओबीसींचे सर्वात मोठे नेते असून ते एक प्रकारे वडिलांच्या भूमिकेत आहेत. त्यामुळे त्यांनी एखाद्या नेत्याकडून भूतकाळात झालेली चूक भर सभेत व्हिडिओच्या माध्यमातून चव्हाट्यावर आणणे योग्य नाही, भुजबळ साहेबांनी तसं करायला नको होतं', असं बबनराव तायवाडे यांनी म्हटलं.

तर भुजबळ यांनी विजय वडेट्टीवारांना एकट्याला ही चूक सांगायला हवी होती. वडेट्टीवार यांनी नागपुरात एवढा मोठा ओबीसी मोर्चा घेऊन दाखवला. त्यांच्याशिवाय विदर्भात एवढी ताकद कोणाची आहे, हे विसरून चालणार नाही, असं सूचक वक्तव्य देखील तायवाडे यांनी केलं. दरम्यान, यावेळी त्यांनी ओबीसी समाजातील नेत्यांमध्ये दुर्दैवाने फूट पडल्याचे चित्र निर्माण होत असल्याची खंतही बोलून दाखवली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT