Jalgaon News, 18 Oct : विधानसभा निवडणुकीत भाजपने राजकीय डावपेच केले. त्याचे पडसाद पाचोरा- भडगाव विधानसभा मतदारसंघात उमटलेत. येथे महायुतीत फूट पडली आहे. शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे आमदार किशोर पाटील यांनी शुक्रवारी स्वबळावर निवडणुका लढविण्याचे घोषित केली.
भाजपबरोबर कदापिही जाणार नाही. माझ्या मतदारसंघात स्वबळावर निवडणुका होतील, अशी घोषणा पाटील यांनी केली. विधानसभा निवडणुकीत भाजपने माझ्या विरोधात अमोल शिंदे यांना उमेदवारी दिली. त्यांना विविध प्रकारची मदत केली. त्यांच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही. उलट त्यांना नवी पदे देण्यात आली.
सध्या माझ्या विरोधात विधानसभा निवडणूक लढविलेल्या वैशाली सूर्यवंशी, अमोल शिंदे, दिलीप वाघ, प्रताप पाटील हे सर्व उमेदवार भाजपबरोबर आहेत. कार्यकर्ते विधानसभेत त्यांच्याविरुद्ध लढले. आता त्याच लोकांसोबत युती कशी होणार? असा प्रश्न आमदार पाटील यांनी केला.
भाजपवर आमदार पाटील यांनी गंभीर आरोप केला. ज्यांनी पाठीत खंजीर खुपसला त्यांच्यासोबत जाण्यापेक्षा, त्यांच्याशी समोरासमोर दोन हात करणार आहे. आता कोणत्याही स्थितीत विषयाची परीक्षा घेणार नाही.
जळगाव जिल्ह्यात महायुतीमध्ये असल्याचे संकेत यापूर्वीच मिळाले होते. शिवसेना शिंदे पक्षाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी याबाबत अधिक इशारा दिला होता. भाजपनेही विविध नेत्यांची मोट बांधली आहे. आगामी निवडणुकीत त्यांची पडद्यामागून स्वबळावर तयारी आहे, हे लपून राहिलेले नाही.
महायुतीत जिथे सर्व सत्ता स्थाने घटक पक्षांकडे आहेत तिथे जागा वाटपाचा तिढा निर्माण होणार आहे. त्यासाठी समन्वय निर्माण करणे कठीण होऊ लागले आहे. त्याची प्रचिती पाचोरा भडगाव मतदार संघात आली. आमदार पाटील यांनी स्वबळाची घोषणा करून महायुतीला सुरुंग लावला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.