Sudhir Mungantiwar and Asaduddin Owaisi : आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सर्वात मोठे 'अॅक्टर' आहेत. ते 'फिल्म इंडस्ट्री'त असते तर आताच्या सगळ्या कलाकारांची त्यांनी 'छुट्टी' केली असती, अशा शब्दात एमआयएमचे अध्यक्ष असदोद्दीन ओवैसी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
आसाम हिंसाचारात होरपळतोय, पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले आहेत. पंतप्रधान मात्र कर्नाटकात 'रोड शो' करत आहेत. 'केरळा स्टोरी' चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत, असा टोलाही ओवौसी यांनी लगावला. ओवैसे यांच्या या टीकेवर वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सडकून टीका केली आहे. ते गोंदिया येथे प्रसारमाध्यामांशी बोलत होते.
दरम्यान, ओवैसी (Asaduddin Owaisi) म्हणाले की, "मोदी हे एक चांगले कलाकार आणि चांगले निर्मातेही आहेत. 'फिल्म इंडस्ट्री'त असते तर त्यांनी सर्व कलाकारांची 'छुट्टी' केली असती. एकीकडे देश आगीत होरपळत असताना पंतप्रधान कर्नाटक राज्यात 'रोड शो' मध्ये मग्न आहेत. खोट्या माहितीवर अधारित असलेल्या 'केरळा स्टोरी' या चित्रपटाचे प्रमोशन करत आहेत. देशातील समस्यांपुढे त्यांना या चित्रपटाचा विषय महत्वाचा वाटत आहे."
ओवैसी यांच्या टीकेला वनमंत्री मुनगंटीवर (Sudhir Mungantiwar) यांनी सडतोड उत्तर दिले आहे. मुनगंटीवर म्हणाले, "ओबीसी नेता या देशाला पंतप्रधान म्हणून लाभल्याने अनेकांचे पोट दुखत आहे. ते फक्त 'ओबीसी' पंतप्रधान नाहीत, तर त्यांनी जगात देशाचा सन्मान वाढवला. त्यांनी जगभर भारताचा डंका वाजविला. स्वतःच्या परिवारापेक्षा देशाला महत्व दिले. जातीच्या राजकारणात एखादा नेता जात, धर्म, रंग, वंश, उंची, वजन यापुढे जाऊन देशाची उंची कशी वाढेल, यासाठी काम करत आहे. माझ्या देशाचे भारत माता हे गोत्र समजून जगभर काम करत आहेत. त्यामुळेच काहींचे पोट जास्तच दुखत आहे. त्यांच्या या पोटदुखीवर जगातील कुठलीही कंपनी औषध निर्माण करू शकणार नाही."
दरम्यान, ओवैसी यांनी तेलंगणात मित्रपक्ष असलेल्या बीआरएस पक्षाचे महाराष्ट्रातील 'एन्ट्री'चे समर्थन केले आहे. ते म्हणाले, "तेलंगणातील बीआरएस पक्षाने महाराष्ट्रात 'एन्ट्री' झाली आहे. कुठलाही राजकीय पक्ष देशात जावून सभा घेवू शकतो, निवडणुका लढवू शकतो. लवकरच 'एमआयएम'ची देखील छत्रपती संभाजीनगर शहरात सभा होणार आहे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.