Kripal Tumane-Parinay Phuke Sarkarnama
विदर्भ

Parinay Phuke-Kripal Tumane : फुके, तुमानेंचे राजकीय वजन वाढले; आमदार होण्यापूर्वीच ‘भावी मंत्री’ म्हणून चर्चेत!

Future Minister List : संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आता फुके आणि तुमाने यांचा नावाचा समावेश होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा पुन्हा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Rajesh Charpe

Nagpur, 03 July : भाजपने विधान परिषदेसाठी विदर्भातून परिणय फुके यांना, तर शिवसेनेने कृपाल तुमाने यांना संधी दिली आहे. विधान परिषदेसाठी येत्या १२ जुलै रोजी मतदान होणार आहे. पण, आमदार होण्यापूर्वीच त्यांच्या नावाची संभाव्य मंत्री म्हणून नागपूर जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.

परिणय फुके (Parinay Phuke) हे माजी आमदार (MLA) आणि राज्यमंत्री राहिलेले आहेत. भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेमधून ते विधान परिषदेवर मागील टर्ममध्ये ते निवडून गेले होते. युतीच्या सरकारच्या काळात देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री असताना ते वन व पर्यटन खात्याचे राज्यमंत्री होते. त्यांनी भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्रिपदसुद्धा सांभाळले आहे.

विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या विरोधात साकोली मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये कडवा सामना रंगला होता. थोडक्या मतांनी फुके पराभूत झाले होते. आता विधान परिषदेत पाठवून त्यांना भाजपने पुन्हा संधी दिली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ते विश्वासू आहेत. हे बघता आगामी मंत्रिमंडाळाच्या विस्तारात फुके यांचे नाव राहील, असा काही कार्यकर्त्यांचा दावा आहे.

दुसरीकडे, शिवसेनेचे (Shivsena) रामटेकचे माजी खासदार कृपाल तुमाने (Kripal Tumane) यांचे लोकसभा निवडणुकीत तिकीट कापण्यात आले होते. विधान परिषदेची आमदारकी आणि मंत्री करण्याचा शब्द लोकसभेच्या निवडणुकीच्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना दिला होता. या पैकी विधान परिषदेची उमेदवारी देऊन मुख्यमंत्र्यांनी आपला शब्द पाळला आहे. हे बघता आता त्यांना शिवसेनेच्या कोट्यातून मंत्रीसुद्धा केले जाईल, अशी त्यांचे समर्थक म्हणतात.

लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर मंत्रिमंडळाचा विस्ताराची चर्चा रंगली होती. या संदर्भात चर्चा आणि बैठकांच्या फैरी पार पडल्या आहेत. त्यावेळी फुके आणि तुमाने आमदार नव्हते. येत्या १२ जुलै रोजी विधान परिषदेसाठी मतदान होणार आहे. त्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे. संभाव्य मंत्र्यांच्या यादीत आता फुके आणि तुमाने यांचा नावाचा समावेश होणार आहे. त्यामुळे अनेक इच्छुकांचा पुन्हा हिरमोड होण्याची शक्यता आहे.

Edited By : Vijay Dudhale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT