narendra modi  sarkarnama
विदर्भ

Narendra Modi News : विधानसभेच्या तोंडावर PM मोदी 'लकी' वर्ध्यात; मोठी घोषणा करणार ?

Rajesh Charpe

Nagpur News : राज्यातील विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असल्याने सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे. त्यातच पंतप्रधान नरेंद्र मोदी शुक्रवारी वर्ध्याला येत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ते विदर्भात येत असल्याने ते आता नव्या घोषणा काय करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

दहा वर्षांपूर्वी मोदी (Narendra Modi) यांनी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवात विदर्भातून केली होती. यवतमाळ जिल्ह्यात शेतकऱ्यांसोबत केलेली ‘चाय पे चर्चा‘ भाजपला (Bjp) चांगलीच फायदेशीर ठरली होती. अद्यापही ‘या चाय पे चर्चे‘ ची चर्चा या- ना त्या कारणाने होतच असते.

2024 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भात मतदान झाले होते. मोदी यांच्या नागपूर-रामटेक, चंद्रपूर-गडचिरोली, वर्धा लोकसभा मतदारसंघात प्रचारसभा झाल्या होत्या. नागपूरचा अपवाद वगळता भाजपचे सर्वच उमेदवार यंदाच्या निवडणुकीत पराभूत झाले असले तरी मोदी यांचे वलय कायम आहे.

मोदी यांच्या वर्ध्यातील सभा विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरुवातच ठरणार आहे. यानिमित्ताने प्रचाराची रणधुमाळीला सुरुवात होणार आहे. अमरावतीमध्ये पीएम टेक्सटाईल पार्क घोषित करण्यात आले होते. त्याचा शुभारंभ नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.

लोकसभेच्या निवडणुकीत विदर्भात भाजपचा मोठा पराभव झाला आहे. विधानसभेच्या निवडणुकीचे सर्व्हेसुद्धा भाजपच्या बाजूने नाहीत. ही पडझड थोपवण्यासाठी महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांच्या खात्यात हप्ते जमा झाले आहेत.

शेतकऱ्यांचे वीज बिल माफ केले आहे. लाडक्या भावालाही अनुदान दिले जात आहे. मोदी सरकारवर शेतकऱ्यांची मोठी नाराजी आहे. ती दूर करण्यासाठी मोदी काही नव्या घोषणा करून त्यांना दिलासा देतील, अशी अपेक्षा भाजपच्या कार्यकर्त्यांना वाटत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना जास्त फायदा व्हावा, यासाठी प्रचंड मोठे निर्णय घेतले आहेत. कच्च्या तेलावर 20 टक्के आयात शुल्क आणि रिफाईंड तेलावर साडेबारा टक्क्यांवरून आयात शुल्क 32 टक्के केले असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. याचा फायदा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होणार आहे.

सोयाबीन खरेदीचा निर्णयही केंद्र सरकारने घेतला आहे. कांद्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला होता. यात मिनिमम एक्सपोर्ट 40 टक्क्यांवर असून तो 20 टक्के करण्यात आला आहे. शेतकऱ्याची मागणी ही केंद्र सरकारने मान्य केली आहे. बासमती राईसच्या निर्यातीवर ड्युटी काढण्यात आली आहे. या निर्णयाचा फायदा राज्यातील सर्व शेतकऱ्यांना होणार असल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT