Mannish Wasamwar Sarkarnama
विदर्भ

Chandrapur Politics : पंचायत समितीचे उपसभापती झाले वैज्ञानिक अधिकारी

Manish Wasamwar : वयाच्या 44व्या वर्षी मिळविले स्पर्धा परीक्षेत यश

संदीप रायपूरे

Chandrapur Politics : अनेक वर्षांपासून सक्रिय राजकारणात असलेल्या एका नेत्याने आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांना सांभाळण्यासह स्पर्धा परिक्षेची तयारी केली. आपल्या समर्थकांना आता या नेत्याने गोड बातमी दिली आहे. कधीकाळी गावचा कारभार चालविणारे आणि उपसभापती असताना ज्यांच्या इशाऱ्याने पंचायत समितीचे प्रशासन चालायचे ते आता प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी झाले आहेत. सातत्यपूर्ण प्रयत्न, प्रबळ इच्छाशक्ती व प्रभावी नियोजन यातून या नेत्याने आता यश मिळविले आहे.

मनीष वासमवार असे स्पर्धा परीक्षेत यश मिळविणाऱ्या नेत्याचे नाव आहे. वासमवार गोंडपिपरी तालुका भापजचे नेते होते. आता मात्र ते अधिकारी झाले आहेत. त्यांनी वयाच्या 44 व्या वर्षी मिळविलेल्या या यशाची आता सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. मनीष वासमवार हे मूळचे गोंडपिपरी तालुक्यातील गणेशपिपरी या गावचे. अभ्यासात हुशार असलेले वासमवारांनी उच्च शिक्षण घेतले आहे. डर.फार्म, एमएससी, एमफिल, पी.एचडी. अशा विविध पदव्या त्यांच्याजवळ आहेत. अनेक अभ्यासक्रमांमध्ये त्यांनी यश मिळविले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

वासमवार बऱ्याच वर्षांपासून राजकारणात सक्रिय आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुका भाजपचे नेते म्हणून ते सध्या कार्यरत होते. गोंडपिपरी पंचायत समितीच्या निवडणुकीत त्यांनी विजय मिळविला. उपसभापती झालेत. दीपस्तंभ या अभ्यासिकेचे सल्लागार म्हणूनही ते कार्यरत आहेत. सक्रिय राजकारणात असताना त्यांनी आपली अभ्यासाशी असलेली नाळ तोडली नाही. राजकारणासोबत त्यांनी वेगवेगळ्या विषयातील अभ्यासक्रम पूर्ण केले. काही दिवसांपूर्वी राज्यात आरोग्य विभागाच्या जागा निघाल्या. गोंडपिपरीत स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या तरुणांनी यासाठी परीक्षा दिली. त्यात मनीष वासमवारही होते. वासमवार यांच्या अभ्यासिकेतील काही सहकाऱ्यांनी त्यांच्याकडे परीक्षा देण्यासाठी आग्रह धरला होता.

विदर्भातून अनुसूचित जाती प्रवर्गातून प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकाऱ्याची एकच जागा होती. त्यामुळे त्यांनी परीक्षा देण्यास नकार दिला. पण सहकाऱ्यांच्या आग्रहास्तव त्यांना शेवटी अर्ज भरला. त्यानंतर मात्र त्यांनी पूर्ण अभ्यास करीत परीक्षा दिली. वेळात वेळ काढत त्यांनी अभ्यास केला. निकाल हाती आला, तेव्हा अनेकांना धक्काच बसला. निकालात मनीष वासमवार यांनी या यश मिळविले होते. चंद्रपूरच्या सक्रिय राजकारणात असतानाही त्यांनी शिक्षण कायम ठेवले होते. त्याचाच फायदा त्यांना झाला. आता वासमवार प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी पदावर रूजू झाले आहेत. कठोर परिश्रम व प्रभावी नियोजन केले की यश मिळतेच. वयाचे 44 वर्ष झाले म्हणून हार न मानता मनीष यांनी अभ्यास केला. यश मिळविले. त्यांच्या या यशामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या युवा वर्गाला सकारात्मक उर्जा मिळाली आहे.

Edited By : Prasannaa Jakate

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT