Praful Patel
Praful Patel Sarkarnama
विदर्भ

Mahayuti Politics : विधानसभेत आम्ही महायुती म्हणूनच लढणार; प्रफुल पटेलांनी ठासून सांगितलं

Rajesh Charpe

Maharashtra Political News : लोकसभेतील पराभवानंतर महायुती एकत्र लढणार नाही, अजित पवार यांना बाहेर काढले जाईल अशा चर्चा सध्या महाराष्ट्रात रंगल्या आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी, आम्ही एकत्रच लढणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले.

अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने लोकसभेच्या निवडणुकीत मदत केली नाही. त्यामुळे भाजपचे उमेदवार पडले असा आरोप होत आहे. विधानसभेत त्यांना दूर ठेवा अशा मागण्याही होत आहेत. दुसरीकडे पवार गटाच्यावतीने हेच आरोप भाजपवर केले जात आहे. त्यामुळे राज्यात महायुतीबाबत संभ्रमाची स्थिती निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर नागपूरमध्ये आलेल्या प्रफुल पटेल यांना छेडण्यात आले.

पटेल म्हणाले, आम्‍ही एकत्रच लढणार आहोत. स्वतः केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी संसदेत सांगून संभ्रम दूर केला आहे. जागा वाटप करताना वादावादी, मतभेद निर्माण होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. महायुतीनेच प्रचार करून जनतेकडे आशीर्वाद मागणार आहोत.

अजित पवार Ajit Pawar यांनी रविवारी पक्षाच्या पार्लमेंटरी बोर्डाची बैठक बोलावली आहे. त्यात विधान परिषदेचा उमेदवार निश्चित केला जाईल. सध्या कोणाचे नाव निश्चित करण्यात आले नाही. आम्ही सर्व एकत्रित बसून नाव ठरवू, त्यानंतर जाहीर करू असेही पटेल म्हणाले.

अर्थसंकल्पावरील विरोधकांच्या आरोपांना उत्तर देताना पटेल म्हणाले, सत्ताधाऱ्यांच्या अर्थसंकल्पाला विरोध करणे हे विरोधीपक्षाचे कामच असते. महायुती सरकारने बजटेमध्ये सर्वांचा विचार केला आहे. शेतकरी, महिला, बेरोजगार, दूध उत्पादकांना दिलासा दिला आहे. विधानसभा जवळ असल्याने विरोधक निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन योजना जाहीर केल्या जात असल्याचा आरोप करीत आहे.

विरोधकांनी कधीही सत्ताधाऱ्यांच्या अर्थसंकल्पाच स्वागत केले नाही. मी कुठल्याही नेत्यांचे नाव घेणार नाही. त्यांची सत्ता होती तेव्हा त्यांनी काय दिले? काही चांगले होत असले तर कधीतरी मोठेपणा दाखवून स्वागत करावे, असा सल्लाही पटेल यांनी विरोधकांना दिला.

दरम्यान, लोकसभा निवडणुकीत भाजपसह महायुतीला मोठा फटका सहन करावा लागला आहे. निकालानंतर भाजपकडून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे यास राष्ट्रवादी अजित पवार गट कारणीभूत असल्याची टीका होत आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्यातील भाजप पदाधिकारी सुदर्शन चौधरी आणि माजी मंत्री सुरेश धस यांनी अजित पवार गट महायुतीत नको, असा आग्रह धरला. यानंतर राजकीय वर्तुळात विविध चर्चांना सुरूवात झाली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT