Uddhav Thackeray Shivsena : ठाकरे गटात Incoming सुरू ; 'या' माजी आमदाराची लवकरच घरवापसी ?

Ramesh Kuthe in touch with Matoshree : कुथे शिवसेना-भाजप युती असताना 1995 आणि 1999 असे दोन वेळा गोंदिया विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.
Uddhav Thackeray
Uddhav ThackeraySarkarnama

Gondia Political News : शिवसेनेचे गोंदिया विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार रमेश कुथे लवकरच घरवापसी करणार आहेत. दोनच दिवसांपूर्वी त्यांनी मातोश्रीला भेट देऊन उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यामुळे ठाकरे गटात आवक वाढणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

कुथे शिवसेना-भाजप युती असताना 1995 आणि 1999 असे दोन वेळा गोंदिया Gondia विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते. त्यानंतर काँग्रेसचे गोपाल अग्रवाल यांनी हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतला. तेसुद्धा दोन वेळा निवडून आले. भाजपने हा मतदारसंघ आपल्या ताब्यात घेतल्यानंतर कुथे यांनी भाजपात प्रवेश केला होता. तेव्हापासून ते उपेक्षितच होते.

भाजपमध्ये असलेल्या इच्छुकांच्या भाऊगर्दी त्यांना निवडणूक लढण्याची संधीच मिळाली नाही. त्यातच 2014 च्या निवडणुकीत गोपाल अग्रवाल यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यावेळी भाजपात मोठे बंड झाले होते. भाजपचे विनोद अग्रवाल यांनी बंडखोरी केली. ते निवडूणसुद्धा आले आहेत. सध्या ते भाजपसोबतच आहेत. हे बघता कुथे यांना संधी मिळण्याची शक्यता नाही.

Uddhav Thackeray
Bhimrao Dhonde : 69 वर्षांचे माजी आमदार भीमराव धोंडे 'हनीट्रॅप'च्या जाळ्यात? मागितली एक कोटीची खंडणी...

भाजपात झालेली कोंडी आणि अस्वस्थ असलेल्या कुथे Ramesh Kuthe यांची मध्यंतरी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भेट घेतली होती. लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पटोले यांनी त्यांच्या घरी भेट दिली होती. त्यावरून ते काँग्रेसमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू होती. त्यावरून ते काँग्रेसमध्ये जाणार असा अंदाज बांधला जात होता. आता त्यांना 'मातोश्री'वरून बोलावणे आले आहे.

गोंदिया-भंडाराचे माजी जिल्हा प्रमुख आणि पूर्व विदर्भाचे सह संघटनमंत्री सतीश हरडे यांनी मातोश्रीचा निरोप त्यांना दिला. त्यानुसार त्यांनी दोन दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांची भेट घेतली. कुथे यांनी अद्याप निर्णय जाहीर केला नसला तरी 'मातोश्री'वरच्या भेटीगाठीवरून ते उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेत परत जातील असे बोलले जात आहे. गोंदिया विधानसभा ठाकरे गटाला जाणार असल्याची यानिमित्ताने जिल्ह्यात सुरू झाली आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Uddhav Thackeray
ShahajiBapu Patil News : सांगोल्यात मोठा ट्विस्ट, अजित पवारांच्या नेत्यानं वाढवली शहाजीबापूंची धडधड,विधानसभा लढण्याविषयी मोठे संकेत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com