Praful Patel On Ajit Pawar Sarkarnama
विदर्भ

Praful Patel On Ajit Pawar CM : '' आज ना उद्या अजितदादा 'मुख्यमंत्री' होणारच... !'' फडणवीसांच्या स्पष्टीकरणानंतरही प्रफुल्ल पटेलांची 'गुगली'

NCP Political News : '' काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते..''

सरकारनामा ब्यूरो

Nagpur : विरोधकांसह सत्ताधारी पक्षांच्या नेतेमंडळींकडूनही 'मुख्यमंत्री'पदावर जोरदार दावे - प्रतिदावे करण्यात आले होते. अखेर राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राज्यातील 'युती' सरकारचे शिल्पकार देवेंद्र फडणवीसांनाच माध्यमांसमोर यावे लागले आणि आपली भूमिका स्पष्ट करावी लागले. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदेच राहतील, दुसरे कोणीही मुख्यमंत्री होणार नाही हे ठणकावून सांगितले. यानंतर मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचं चित्र असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी पुन्हा एकदा अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाबाबत सूचक विधान करत गुगली टाकली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे नेते आणि खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी नागपूर येथे माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावर भाष्य केले. पटेल म्हणाले, आज मुख्यमंत्रीपदाची जागा रिकामी नाही, मग चर्चा कशाला करता? सध्या अजितदादा नक्कीच महाराष्ट्राचे एक वजनदार आणि लोकप्रिय नेते आहेत.

आमच्या पक्षाचे नेतृत्व ते आज नाही तर अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात करत आलेले आहेत. काम करणाऱ्या माणसाला आज ना उद्या संधी मिळत असते, आणि अनेक लोकांना मिळालेली आहे. मग अजितदादांना सध्याच्या घडीला नाही पण भविष्यात नक्कीच कधी ना कधी मुख्यमंत्रीपदा(Chief Minister) ची संधी मिळेल,आणि आम्ही देखील त्या दिशेने काम करु असा विश्वास पटेलांनी व्यक्त केला.

मिटकरींचं खळबळजनक ट्विट

राज्यात मुख्यमंत्री बदलाच्या चर्चांना उधाण आले असतानाच एकनाथ शिंदे कुटुंबासह दिल्लीला रवाना झाले. हेच टायमिंग साधत अमोल मिटकरी यांनी अजित पवारांचा एक व्हिडिओ ट्विट केला. या व्हिडिओला 'मी अजित अनंतराव पवार महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतो की......! लवकरच #अजितपर्व' अशी कॅप्शनही दिले. मिटकरी यांच्या या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

अजितदादा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर....

राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याची जोरदार चर्चा आहे. यावर कर्जत जामखेड मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनीही अजितदादांच्या मुख्यमंत्रीपदावर मोठं विधान केलं आहे.

पवार म्हणाले, अजित पवार(Ajit Pawar) हे जर महाविकास आघाडीमध्ये असते तर पुढचे पाच वर्ष तेच मुख्यमंत्री राहिले असते. पण आता मी अजितदादांचा पुतण्या आहे. त्यामुळे अजितदादा जर राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मला आनंदच होईल, परंतू, सामान्य नागरीक म्हणून मला ही गोष्ट पटणार नाही असेही पवार यांनी सांगितले. सध्या राष्ट्रवादी, काँग्रेस आणि शिवसेना यांच्यामध्ये भांडण लावून दुसरे उपमुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री बनवण्याचा हा प्रयत्न नाही ना? असा प्रश्नही रोहित पवार यांनी उपस्थित केला आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT