Praful Patel Sarkarnama
विदर्भ

Praful Patel : प्रफुल पटेलांनी ‘या’साठीच केली होती भाजपशी मैत्री !

CBI Closure Report : भाडेकरारात करार लवकर संपविण्याबाबतच्या कलमाचा उल्लेख आढळला नाही. त्यामुळे सीबीआयने पटेल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. आता प्रफुल पटेलांसह त्या सर्व अधिकाऱ्यांची चिंता मिटली आहे.

सरकारनामा ब्यूरो

Praful Patel : अजित पवार गटाचे नेते राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांच्या विरोधातील भ्रष्टाचार प्रकरणाचा तपास बंद करत त्यांना सीबीआयने क्लीन चिट दिली. विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीपूर्वीच पटेलांना क्लीन चिट मिळाल्याने प्रफुल पटेलांना भाजपची मैत्री फायद्याची ठरली असल्याचे बोलले जात आहे. किंबहुना यासाठीच पटेलांनी भाजपशी मैत्री केली, असे बोलले जात आहे.

एअर इंडियाला विमान भाडेतत्त्वावर देताना नागरी उड्डाण मंत्रालय आणि एअर इंडियाच्या अधिकाऱ्यांनी गैरव्यवहार केल्याप्रकरणी 2017मध्ये सीबीआयने गुन्हा नोंदविला होता. प्रफुल पटेल यांनी नागरी उड्डाण मंत्री असताना त्यांच्या विभागासह एअर इंडिया व अन्य लोकांच्या संगनमताने त्यांनी आपल्या केंद्रीय मंत्रिपदाचा वापर एअर इंडियासाठी विमाने भाडेतत्त्वावर देण्यासाठी केल्याचा आरोप होता. एअर इंडियासाठी विमाने घेतली जात असताना, हा भाडेकरार करण्यात आल्याचाही आरोप त्यांच्यावर होता.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तपासादरम्यान भाडेकरारात करार लवकर संपविण्याबाबतच्या कलमाचा उल्लेख आढळला नाही. त्यामुळे सीबीआयने पटेल यांच्यासह अन्य अधिकाऱ्यांना क्लीन चिट दिली आहे. आता प्रफुल पटेलांसह त्या सर्व अधिकाऱ्यांची चिंता मिटली आहे. भाजपने या प्रकरणात कारवाईचा धाक दाखवून पटेलांना आपल्याकडे ओढल्याचेही बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंड झालं आणि ज्येष्ठ नेते आणि शरद पवार यांची साथ सोडून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत भाजपबरोबर पटेल सत्तेत सामील झाले. त्यानंतर त्यांना वर्षभराच्या आतच दिलासा मिळाल्याने याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे.

राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) नेते प्रफुल पटेल यांच्याशी संबंधित प्रकरण हे सीबीआयडे प्रलंबित होते. मागील सात ते आठ वर्षांपासून सीबीआयकडून याबाबत तपास केला जात होता. मागील सात वर्षांपासून कोणताही दिलासा पटेलांना मिळाला नव्हता. पण आता त्यांना सीबीआयने क्लीन चिट दिली आहे. सीबीआयने याबाबत क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता.

कोणताही पुरावा प्रफुल पटेल यांच्याविरोधात सापडला नसल्याचे सीबीआयने क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केले आहे. 2017 मध्ये पटेलांवर सीबीआयने गुन्हा दाखल केला होता. मंत्रिपदावर असताना प्रफुल पटेल यांनी भ्रष्टाचार करून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा केल्याचा हा कथित आरोप होता. तेव्हापासून सीबीआयची चौकशी आणि या प्रकरणी तपास सुरू होता. मात्र, आता हा मोठा दिलासा पटेल यांना मिळाला आहे.

Edited By : Atul Mehere

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT